श्रीरामपूर:-विश्वकर्मा वंशीय समाजाच्या शिरपेचात मानाचा तूरा……
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
विश्वकर्मा वंशीय समाजाच्या शिरपेचात मानाचा तूरा……

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रवक्ते उत्तम सुतार सर यांची सुकन्या कु उत्कर्षा उषा उत्तम सुतार ( रा हेरवाड . जयसिंगपुर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर ) हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट – व सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ यामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातून राज्यात १४ व्या रँकने आणि ओबीसी मुलीमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळवून विक्री कर निरीक्षक ( STI ) या पदी निवड झाल्याबद्दल तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विश्वकर्मा वंशीज समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री नागोजीराव पांचाळ सर यांनी फोनवरून तिचे गोड कौतुक करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच निच्या आई – वडिलांचेही मनापासून अभिनंदन व कौतुक केले यावेळी विश्वकर्मा वंशी ज समाज संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री संजय सुतार सर ( नांदणी कोल्हापुर ) आयटी सेल प्रमुख श्री विनायक सुतार सर ( कोल्हापुर ) विभागीय संघटन श्री विजय सुतार ( उमळवाड कोल्हापुर ) आणि विभागीय अध्यक्ष श्री विनायक सुतार ( सांगली ) यांनी पुष्पगुच्छ देऊन तिला भावी कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच याच्याही पेक्षा अधिक देदीप्यमान यश मिळो अशा सदिच्छा व्यक्त केल्या.




