आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुडाळ:-(सिंधुदुर्ग)-अवैध धंद्यांना वेळीच आवरा! गृह (शहरे),महसूल ग्रामीण विकास व पंचायती राज,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेश कदम यांचे पोलिसांना आदेश.

पत्रकार शैलेश मिस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत

1) अवैध धंद्यांना वेळीच आवरा!
गृह (शहरे),महसूल ग्रामीण विकास व पंचायती राज,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेश कदम यांचे पोलिसांना आदेश.

कुडाळ : लोकप्रतिनिधी व प्रशासन यांची सांगड घालून चांगले काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले. ते म्हणाले, कोकणात अवैध धंद्यांचे प्रमाण कमी असले तरी जे चालू आहे त्याला वेळीच आळा घाला, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपतालुकाप्रमुख अनिकेत तेंडुलकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके आदी यावेळी उपस्थित होते.
कदम म्हणाले, कालच जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील शासकीय कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची सांगड घालून कोकणातील सर्व प्रश्न सोडविण्या- साठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने या आढावा बैठकीत सर्व सबंधित यंत्रणांकडून आढावा घेण्यात आला.

2) कुडाळ:-झाराप येथे ‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न
■ अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल.

कुडाळ : झाराप येथे मुंबई गोवा महामा- गवर असणारे बँक ऑफ इंडिया बँकेचं एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना ते जमलं नाही. बँकेच्या एटीएममधील साडे आठ लाख रुपये सुरक्षित आहेत. या प्रकरणी बँक व्यवस्था पकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या एटीएममध्ये सुरक्षेसाठी कोणीही नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री २ वाजता
‘या’ एटीएमच्या तिजोरीचा दरवाजा चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केल्याची
माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक वैशाली अडकुरी, पोलीस निरीक्षक प्रवीण धडे, पिंगुळी बिट अमलदार ममता जाधव, सुबोध मळगावकर, समीर बांदेकर, सुप्रिया भागवत, निकम, अमोल बंडगर ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांसोबत श्वानपथक तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञही एटीएम केंद्रात पोहचले होते. एटीएम कापण्यासाठी एटीम बाहेर चोरट्यानी कटर व इतर साहित्य टाकले आहे ते पोलिसांना सापडले.

3)’सिंधुकन्या’ ठरली ‘ सुवर्णकन्या!’ पखवाजवादनात मिळविले सुवर्णपदक : मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सन्मान.

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावाच्या सुकन्या, पखवाज विशारद कु. श्रुतिका श्रीकृष्ण मोर्ये, हिने ‘युथ फेस्टिवल २०२५ मध्ये सुवर्णपदक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. पखवाज एकल वादनात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिलीच विद्यार्थिनी (महिला) ठरली आहे, ज्यामुळे संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळचे नाव महाराष्ट्रात गाजले आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ५८ व्या इंटर कॉलेज कल्चरल युथ फेस्टिवल मध्ये श्रुतिकाने हे यश संपादन केले. ‘क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल सोलो, तालवाद्य’ प्रकारात तिने आपल्या पखवाज वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेत राज्यभरातील ३६ अव्वल दर्जाच्या
स्पर्धकांमध्ये तिचा सहभाग होता, तरीही तिने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने सर्वांना मागे टाकले आणि अव्वल क्रमांक पटकावला.या यशामागे तिच्या अथक परिश्रमासोबतच योग्य मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले आहे. तिचे आई-वडील, संत राऊळ महाराज महाविद्यालयातील ,आणि विशेषतः नामदेव महाराज संगीत विद्यालयाचे शिक्षक वर्ग यांचे मार्गदर्शन मिळाले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button