सातारा:-वाई भाजी मंडईतील मुख्य रस्त्यास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पथ असा नाम फलक लावा आणि भाजी मंडईतील संविधान स्तंभाचे तात्काळ सुशोभीकरण करा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई मुख्याधिकारी यांना निवेदन.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई भाजी मंडईतील मुख्य रस्त्यास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पथ असा नाम फलक लावा आणि भाजी मंडईतील संविधान स्तंभाचे तात्काळ सुशोभीकरण करा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई मुख्याधिकारी यांना निवेदन.

सातारा वाई.
दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी वाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत वाई नगर परिषदेचे कार्यालय निरीक्षक नारायण गोसावी यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन. वाई नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या विविध रस्त्यांना विविध लोकांची महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत आणि त्या पद्धतीचे नाम फलक देखील तेथे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत .परंतु वाई मुख्य बाजारपेठेत देव दुकान ते संविधान चौक ,भाजी मंडई या रस्त्यास काही वर्षांपूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पथ असे नाव असलेला नाम फलक होता परंतु सद्यस्थितीत तो तेथे दिसून येत नाही . तरही तात्काळ संबंधित रस्त्याच्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पथ असा नाम फलक लावण्यात यावा .त्याचबरोबर वाई भाजी मंडई येथील मुख्य चौकात भारतीय संविधानाचा स्तंभ असून त्याच्यावर भारतीय संविधानाची प्रास्ताविका आहे. परंतु तो सध्या चांगल्या अवस्थेत दिसून येत नाही ,त्या स्तंभास सुशोभीकरणाची गरज आहे. तरही संबंधित स्तंभाची तात्काळ सुशोभीकरण करा आणि संबंधित रस्त्यास नाम फलक लावा अशा आशयाचे निवेदन पदाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. संबंधित विषय हे कोणाचे व्यक्तिगत नसून हा देश ज्यांच्या बुद्धिमत्तेवर चालला आहे असे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि हा देश ज्या गोष्टीवर अवलंबून कार्य करतो असे भारतीय संविधान याच्या संबंधित असल्याकारणाने सदर विषयावर लवकरात लवकर कोणतेही कार्य तत्परता न दिसल्यास प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे,जिल्हा संघटक विकास दादा जाधव, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, युवक अध्यक्ष आकाश गायकवाड ,युवक उपाध्यक्ष रोहित बंडा कवळे,शहर अध्यक्ष रणवीर परदेशी,मिलिंद जाधव,विशाल जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




