साताऱ्यात शनिवारी दि:२० सप्टेंबर रोजी सॅटर्डे क्लब च्या वतीने अभियंता दिन व प्रदर्शन ….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
साताऱ्यात शनिवारी दि:२० सप्टेंबर रोजी सॅटर्डे क्लब च्या वतीने अभियंता दिन व प्रदर्शन ….

सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या साताऱ्यात अनेक उद्योग निर्माण होत आहे. त्याला अधिक गती देण्यासाठी साताऱ्यातील नामांकित अशा सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. त्याच्याच भाग म्हणून शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत अभियंता दिन साजरा करण्यात येणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. याचबरोबर सातारा परिसरातील जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या कास पठारला सहभागी होणारे अनेक मान्यवर भेट देणार असल्याने सातारच्या उद्योग व पर्यटन क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एक बिझनेस नेटवर्किंग संस्था
आहे, जी बिझनेस वाढवण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी काम करते. ही संस्था बिगर-नफा तत्त्वावर चालते. याचा सातारकरांना अभिमान आहे. या संस्थेची स्थापना २००१ साली श्री. माधवराव भिडे यांनी केली. मराठी तरुणांमध्ये उद्योजकतेची भावना वाढवणे आणि त्यांच्यातील सुप्त गुण व सचोटीला योग्य दिशा देणे. ‘एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.
साताराचा गौरवशाली अभियांत्रिकी वारसा सांगणारा इंजिनियर्स डे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट द्वारे
आयोजित अभियंता सर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून साजरा होत आहे. दि: २० सप्टेंबर रोजी अभियंता दिन आणि प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि इंदोर येथून व्यावसायिक येणार आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी झाल्याची माहिती सातारा येथे झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत दिली . अभियंता दिन व प्रदर्शन कार्यक्रम मोफत असून यासाठी जय्यत तयारी झाली आहे. भारतातून अनेक जण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सातारला दाखल झालेले आहेत. अशी ही माहिती आयोजक प्रतीक मालपुरे, किशोर सूर्यवंशी व प्रणित कुंदप, सचिन कुंभार यांनी दिली.
सातारच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये नावलौकिक या कार्यक्रमाला स्टॅर्ड. क्लबचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अशोक दुगाडे, श्री. सुहास फडणीस, आणि
श्री. केदार साखरे , श्री. गिरीष घुगरे आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.
या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले , आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अभियंता राहुल अहिरे ,अभियंता राजू जगताप, वास्तू रचनाकार विलास अवचट, औद्योगिक कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर व बांधकाम व्यवसायाच निगडित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.




