सातारा:-भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद.

जाहीर आभार आणि अभिनंदन
भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सातारा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी विचारधारा जोपासणारी राजकीय, सामाजिक,शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जन आक्रोश आंदोलन मोर्चा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु.अशोक भालेराव यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष सरचिटणीस कोषाध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन जनमानसात भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून नवं उत्साह निर्माण केला.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी आदरणीय अरुण भाऊ पोळ, जिल्हाध्यक्ष आयु.अरुण भोसले, जिल्हाध्यक्ष आयु.नानासाहेब मोहिते, महिला जिल्हा अध्यक्षा संगिताताई डावरे, जिल्हाध्यक्षा सुजाताताई गायकवाड, जिल्हाध्यक्षा बनसोडे ताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले.
या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आयु.व्ही.आर.थोरवडे साहेब,आयु.दिलीप फणसे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा सरचिटणीस आयु.यशपाल बनसोडे, जिल्हा सरचिटणीस आयु.अरुण गायकवाड,आयु.सचिन आढाव जिल्हा कोषाध्यक्ष,आयु.मिलिंद कांबळे संस्कार उपाध्यक्ष ,आयु.भागवत भोसले संस्कार सचिव,आयु.काशिनाथ गाडे उपाध्यक्ष पर्यटन,आयु.उत्तम पवार पर्यटन सचिव,आयु.महादेव शेलार जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष,आयु.पोपट यादव संरक्षण सचिव यांनी सहभाग घेऊन आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून सहभाग नोंदविला.
संरक्षण उपाध्यक्ष आयु.महादेव शेलार यांच्या नेतृत्वाखाली डिव्हिजन ऑफिसर आयु.पिराजी सातपुते,आयु.सुनिल सकपाळ साहेब आणि संपूर्ण समता सैनिक दलाच्या कितने, महिला समता सैनिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सर्व सातारकरांचे लक्ष वेधून कामकाज केले.त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी सातारा तालुका अध्यक्ष आयु.ॲड.विजयानंद कांबळे,कराड तालुका अध्यक्ष आयु.यशवंत आप्पा अडसूळे,पाटण तालुका अध्यक्ष आयु.आनंदा गुजर, जावळी तालुका अध्यक्ष आयु.मोहन खरात, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष आयु.नितीन गायकवाड आणि वाई तालुका अध्यक्ष आयु.आनंदा कांबळे आणि त्यांच्या कार्यकारिणी पदाधिकारी यांनी सर्वांनीच मेहनत घेऊन मोर्चा यशस्वी केला.तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी यशस्वी सहभागी होऊन सहकार्य केले त्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष आयु.अशोक भालेराव यांच्या वतीने मनापासून अभिनंदन आणि आभार.असेच सहकार्य नियमित करावे असे आवाहन करण्यात येत आहे.




