कणकवली येथील एस.एम.प्रशालेच्या विद्यार्थिनींचे जिल्हास्तर कला उत्सव स्पर्धेत यश.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कणकवली येथील एस.एम.प्रशालेच्या विद्यार्थिनींचे जिल्हास्तर कला उत्सव स्पर्धेत यश.

कणकवली : येथील एस. एम. हायस्कूल, कणकवली या प्रशालच्या नववीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षात झालेल्या जिल्हास्तरीय कला – उत्सव स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रशालेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कला – उत्सव नृत्य समूह स्पर्धा प्रकारामध्ये एस.एम. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामध्ये तेजस्विनी देवलकर, दीपिका
आंगणे, मनश्री लोहार, अस्मी तांबे या विद्यार्थिनींनी उत्तम कला सादर करत नेत्रदीपक यश मिळविले आहे. या नृत्य समूहाची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. यासाठी त्यांचे तसेच त्याला मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवली चे कार्याध्यक्ष डॉ.एस.सी.सावंत, सचिव डी.एम.नलावडे, उपकार्याध्यक्ष डॉ. एस. एन. तायशेटे, उपकार्याध्यक्ष एम.ए.काणेकर त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक जी.एन.बोडके, उपमुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले.




