भुसावळ:-शालेय मुलींनच्या खो-खो स्पर्धा उत्साह संपन्न.(रा,धो. माध्यमिक विद्यालय, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय. गंगाधर सांडू विद्यालयाचे संघ विजयी)
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शालेय मुलींनच्या खो-खो स्पर्धा उत्साह संपन्न.(रा,धो. माध्यमिक विद्यालय, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय. गंगाधर सांडू विद्यालयाचे संघ विजयी)

भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी स्कूल भुसावळ येथे मुलींनच्या १४,१७,१९ वर्षातील तालुका स्तरीय खो-खो स्पर्धां उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.

सदर स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ चे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पी.आय.भारती काळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार प्रीती लुटे, प्रमुख अतिथी बियाणी एज्युकेशन ट्रस्टचे पियुष बियाणी यांच्यासह शाळेचे प्राचार्य रुद्रसेन गाठीयां महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वयक डॉ.प्रदीप साखरे,मुख्याध्यापिका अपर्णा राजपूत, विलास पाटील, वंदना ठोके, यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, खेळाडू, पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम उद्घाटक भारती काळे (पाटील) व कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रीती लुट्टे यांच्या हस्ते प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद व मामा बियाणी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन व क्रीडांगण पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ प्रदीप साखरे यांनी केले.प्रिती लुट्टे यांनी विविध दाखल्यां विषयी माहिती दिली त्याच बरोबर ते दाखले आपणापर्यंत सोप्या पद्धतीने कसे पोहोचतील याविषयी माहिती दिली त्याचबरोबर नारी कशी सक्षम असते याविषयी विवेचन केलं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे सांगितले.
भारती काळे पाटील मॅडम
पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते याविषयी मार्गदर्शन केले तक्रारदाराच्या अपेक्षा काय असतात फिर्यादीच्या काय अपेक्षा असतात याविषयी सुद्धा माहिती दिली त्याचबरोबर खेळाडूंना डायट व हायड्रेशन किती महत्त्वाचे असते याविषयी विवेचन केले त्याचबरोबर या स्पर्धांमधून तुम्हाला शासन 5% आरक्षण देतं ते तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी खूप फायदेशीर असतं म्हणून तुम्ही खेळत राहिले पाहिजे जेणेकरून या आरक्षणाचा फायदा तुम्हाला होऊ शकतो स्पर्धेचे उद्घाटक भारती काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाडूंचे सर्व स्पर्धेत सहभागी होता म्हणून मनःपूर्वक अभिनंदन केले. स्पर्धेत सहभागी झाले हाच आपला विजय आहे असे व खेळाडूनी कुठल्याही संकटाला न डगमगता त्यावरती कणखर बनवून मात करावी.व यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले खेळाडू वृत्तीने खेळून आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे व जयपराचे आपण पचवावा असे मार्गदर्शन केले. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व खेळाडूंनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून विजय संपादन करावा.असे मनोगतातून सांगितले. सदर स्पर्धेत सर्व गटातील मुलांचे २२संघ / २४४ खेळाडूंनी भाग नोंदविला तर मुलींच्या २७संघ/३२४ खेळाडू नी सहभाग नोंदविला यात , मुलींचा 14 वर्षातील अंतिम सामना राधो माध्यमिक विद्यालय कुऱ्हा पानाचे विरुद्ध माध्यमिक विद्यालय ओझरखेडा यांच्यात झाला यात राहतो माध्यमिक विद्यालय कुऱ्हा पानाचे विजयी झाले तर माध्यमिक विद्यालय ओझरखेडा द्वितीय स्थानी राहिले, तर दामू पांडू पाटील संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागेल, सतरा वर्षातील मुलींचा अंतिम सामना पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय वराडसीम विरुद्ध अरुणोदय माध्यमिक विद्यालय बोहर्डी यांच्यात झाला यात पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय विजयी झाले तर अरुणोदय विद्यालय द्वितीय स्थानी राहिले तर श्रीकृष्ण हायस्कूल शिंदीला तृतीय स्थानी समाधान मानावे लागले. 19 वर्षातील मुलींच्या सामन्यात गंगाधर सांडू चौधरी ज्युनियर कॉलेज विरुद्ध बियाणी ज्युनिअर कॉलेज यांच्यात झाला यात गंगाधर सांडू विद्यालय विजयी तर बियाणी ज्यु. कॉलेज चा संघ द्वितीय स्थानी राहिला तर बी. झेडउर्दू हायस्कूल संघिला तृतीय स्थाना वरती समाधान मानावे लागले खो-खो स्पर्धा पंच म्हणून डॉ प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली, व्ही. एस. पाटील, मुकेश मोरे, अनिल महाजन, लक्ष्मीकांत नेमाडे ,सुनील चौधरी, एन. डी.राजपूत,नविन नेमाडे, दिलीप सुरवाडे, राठोड सर,अझर सर, यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी पी.आर. साखरे, रुद्रसेन गाठीयां , तोसीब कुरेशी,यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक व बियाणी स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र बद्ध सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केले.




