वाई:-किंचक टेकडीच्या उत्खनन प्रकरनी केलेला दंड तात्काळ वसूल करा आणि देगाव येथील गट नंबर 955 वरील त्रासदायक पोल्ट्री बंद करा या मागणी करिता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रांताधिकार्यांना निवेदन लवकरच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
किंचक टेकडीच्या उत्खनन प्रकरनी केलेला दंड तात्काळ वसूल करा आणि देगाव येथील गट नंबर 955 वरील त्रासदायक पोल्ट्री बंद करा या मागणी करिता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रांताधिकार्यांना निवेदन लवकरच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.
सातारा वाई.वाई तालुक्याला भला मोठा असा प्राचीन इतिहास लाभलेला आहे. याच इतिहासाचा पुरावा म्हणजे सुलतानपूर गावात असलेली किंचित टेकडी. सदर टेकडीच्या गट नंबर 2/1/2/3/4/5 वर दोन वर्षांपूर्वी काही धनदांगट भूमाफीयांनी बेकायदेशीर उत्खनन केले या विषयाचा मा. जिल्हाधिकारी यांना भेटून सबळ पाठपुरावा करून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पाठपुराव्यामुळे आणि सजगतेमुळे सदर माफियांवर अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी 3 कोटी 92 लाख इतका दंड प्रशासनाने केला आहे. सदर दंड कमी होण्याकरिता मा. प्रांताधिकारी यांच्या दालनात भूमाफीयांनी अपील सुद्धा दाखल केले आहे. परंतु त्यांच्यावर कोणतेही गया न करता सदर दंड जसाच्या तसा तात्काळ वसूल करा.
त्याचबरोबर मौजे देगाव हद्दीत गट नंबर 955 वर बाबर नामक एका व्यक्तीने 80 हजार बॉयलर कोंबड्यांचे पोल्ट्री टाकलेली आहे. सदर कोंबड्यांची विस्टा तो कोणतेही विल्हेवाट न लावता हक्काच्या मालकीच्या जमिनीत गावात एका शेतीचा तुकड्यात आणून टाकत आहे ,परंतु विष्ठेची कोणतेही विल्हेवाट न लावण्यामुळे सदर विस्टा ही पाण्याने पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन जमिनी आणि जलाशय बाधित झाले आहेत. यामुळे कित्येक लोकांच्या जमिनी पडून आहेत तसेच लोकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न बळावला आहे.
त्यामुळे सदर पोल्ट्री धारकाकडे कोणतीही ग्रामपंचायत परवानगी नसताना देखील सुरू पोल्ट्री तात्काळ बंद करून लोकांना होणारा नाहक त्रास थांबवा आणि पोल्ट्री बंद करा या मागण्यांसाठी महाराष्ट्र पब्लिकन पक्षातर्फे वाई उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .सदर दोन्ही मुद्द्यांवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संघटक विकास दादा जाधव, वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, युवक अध्यक्ष आकाशभाई गायकवाड, शहराध्यक्ष रणवीर परदेशी, युवक उपाध्यक्ष रोहित कवळे, विशाल जाधव आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.