कणकवली:-जनसुरक्षा कायदा रद्द करावा,अशा मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयात सादर.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कणकवली:-जनसुरक्षा कायदा रद्द करावा,अशा मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयात सादर.
कणकवली:-महायुती सरकारने महाराष्ट्र विशेष
जनसुरक्षा कायदा लागू करणार असल्याची तरतूद विधिमंडळात केली आहे. या कायद्याविरोधात संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा जनविरोधी, घटनाविरोधी, लोकशाहीचा हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी कणकवलीत जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले.
यावेळी ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा’, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो’, ‘युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा विजय असो’, ‘झालाच पाहिजे झालाच पाहिजे, जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी ठाकरे शिवसेनेच्यावतीने कणकवली प्रांतकार्यालयाबाहेर करत सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर पारकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदिश कातकर यांची भेट घेत सरकारने जनसुरक्षा कायदा रद्द करावा, अशा मागणीचे त्यांना निवेदन सादर केले.