आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:- वाढती गुन्हेगारी ही मोठी समस्या मा.बाळासाहेब भरणे.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

वाई दि.12
वाढती गुन्हेगारी ही मोठी समस्या मा.बाळासाहेब भरणे.

 

आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे दिशाहीन होत आहे. कळत नकळतच तरूणाई गुन्हेगारी प्रवृत्ती कडे वळत आहे. त्यांना वेळीच आवर घातला नाही तर, गुन्हेगारी ही एक सामाजिक समस्या बनेलअसे प्रतिपादन वाईचे पोलिस निरीक्षक मा. बाळासाहेब भरणे यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे शेंदुरजणे येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते वाढती गुन्हेगारी आणि त्यावरील उपाय या विषयावरील प्रबोधन पर व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शेंदुरजणे गावचे माजी सरपंच सुरेश जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी एन. एस. एस. चे सल्लागार डॉ चंद्रकांत कांबळे , प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात डॉ.अंबादास सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. भरणे म्हणाले, आपल्याकडे कुणीतरी बघावे, आपल्याला प्रसिद्धी मिळावी या खोट्या हव्यासापोटी तरूण वर्ग गुन्हेगारी कडे वळत आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार करावेत. एन एस एस सारख्या शिबिरांतून चांगले संस्कार होतात.अशी शिबिरे श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देतात, म्हणून अशा शिबिरांना विद्यार्थ्यांनी पहिली पसंती द्यावी असे त्यांनी आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. सुरेश जगताप म्हणाले, किसन वीरच्या विद्यार्थ्यांनी काम किती केले त्यापेक्षा त्यांनी ग्रामस्थांशी नाते कसे प्रस्थापित केले हे पाहणे मला महत्त्वाचे वाटते. नवी पिढी भरणे साहेबांकडे पाहून घडावी असे मला मनोमन वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. अंकिता रत्नपारखे हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. प्राची जगताप हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जयवंत पवार, दत्तात्रय जगताप, विजय गायकवाड, शिवाजी नवले, महेंद्र येवले, केशवराव गायकवाड तसेच शेंदुरजणे गावातील ग्रामस्थ व एन.एस.एसचे स्वयंसेवक उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button