कोरेगावात हॉटेल व्यवसायिकांना खंडणीचा त्रास, न्यायासाठी तक्रारीबाबत दुस्वास….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कोरेगावात हॉटेल व्यवसायिकांना खंडणीचा त्रास, न्यायासाठी तक्रारीबाबत दुस्वास….
कोरेगाव दि: कोरेगाव तालुक्यामध्ये व्यवसाय करणे पूर्वी नेत्र दीपक प्रगतीचे द्वार होते. आता काही टुकार खंडणीखोरांमुळे हॉटेल व्यवसायिक त्रास सहन करत आहेत. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीबाबत दुस्वास केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सातारा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा- कोरेगाव रस्त्यावरील ल्हासुर्णे फाटा हॉटेल बापूची बैठक येथील आचारी कैलास कांबळे यास मारहाण करून हॉटेल परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले . सदरचा प्रकार हा खंडणी बाबत घडला असल्याची तक्रार देण्यात आली. सदर घटना स्थळीचे हॉटेल बापूची बैठक मधील
सी.सी.टी.व्ही फुटेज देऊन देखील कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई व कायदा सुव्यवस्था बाबत कलमे न लावता
कारवाई न केल्यामुळे सदरच्या बीट अंमलदार यांना निलंबित करण्याची मागणी करावी लागलेली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये सध्या गुंडाराज संरक्षण मोहीम राबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का? अशी चर्चा सुरू झालेली आहे.
फुटकाळ खंडणीखोरांविरुद्ध कारवाई न केल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
सातारा- कोरेगाव रस्त्यावरील ल्हासुर्णे गावातील दोन युवक दिनांक १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास हॉटेलमध्ये आले . अर्वाच्य शिवीगाळ करून हॉटेलचे आचारी कैलास कांबळे यांना मारहाण केली. त्या ठिकाणी आठ ते दहा युवकांना आणून दहशत माजवली.
त्यातील सराईत आरोपी फिरोज इनामदार
याने साडेचार च्या सुमारास 07972544385 (०७९७२५४४३८५) या नंबर वरून वीस हजाराची खंडणी मागितली खंडणी न दिल्यास आज हॉटेल पेटवून टाकू व
आचाऱ्याला जिवंत मारण्याची धमकी दिली. पोलीस संरक्षण मिळत असल्याने त्यांनी हे कृत्य केले असावे. असा समज झाला आहे.
सदर सर्व पुरावे हॉटेलने स्वखर्चाने बसवलेल्या सी.सी.टी.व्ही. मध्ये कैद झालेले आहेत . याची माहिती पोलिसांना देण्यात आली. परंतु तपास करत असताना क्राईम स्पॉट वरील गाडी पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली नाही , क्राईम स्पॉट वरील ते दोन तरुण ज्यांच्या नावाची माहिती असताना देखील
त्यांनी त्यांना अटक केली नाही, सदर आठ ते दहा युवक हॉटेलमध्ये घुसून आचारी यांना मारण्याचा प्रयत्न करतात धमक्या देत आहेत. अंगावर धावून जात आहेत. त्यांना देखील सह आरोपी करून अटक केली नाही. अशा आशयाचे निवेदन देण्यात आलेले आहे. या गंभीर बाबीकडे आता हॉटेल व्यवसायिकांनीही लक्ष केंद्रित केले आहे.
कोरेगाव मध्ये खंडणीखोरांमुळे अनेक हॉटेल बंद अवस्थेत आहेत. जे नियमप्रमाणे हॉटेल व्यवसाय करत आहेत. त्यांना दमदाटी व खंडणी मागितल्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून न्याय मिळत नसल्याने काही जणांनी नाईलाज म्हणून संविधानात्मक दुसरा मार्ग पत्करल्याची आता चर्चा होऊ लागलेली आहे.
हॉटेल बैठक मध्ये घडलेल्या घटनेत संघटित गुन्हेगारी वाटत आहे. त्यामध्ये सह आरोपी म्हणून विवेक संपत चव्हाण, तुषार अर्जुन चव्हाण, विकास बबन चव्हाण, सोमनाथ हनुमंत चव्हाण, इतिक राजेंद्र चव्हाण,
अभिषेक चव्हाण, रोहन चव्हाण यांच्यावर कारवाई केली नाही.सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्वरित आदेश देऊन सदर घटनेची चौकशी करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. व कडक कारवाई करून अशा
प्रकारचे कृत्य पुन्हा त्यांच्याकडून घडू नये. यासाठी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेचे मार्गदर्शन करावे. अशी हात जोडून विनंती केलेली आहे.
दरम्यान, याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या संबंधिताच्या बाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी असून पोलीस अधीक्षकांनी यांची खाते न्याय चौकशी करावी. यासाठी कोरेगाव तालुक्यातील अन्यायग्रस्त लघुउद्योजक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.