वैजापूर:- नालेगाव येथील भागीरथी विद्यालयात स्वातंत्र्याचा महोत्सव हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत 79 वा स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
भागीरथी विद्यालयात स्वातंत्र्याचा महोत्सव हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत 79 वा स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न.
माळेवाडी (श्रीरामपूर प्रतिनिधी )
वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच ज्योतिर्मय महाविद्यालय श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वसतिगृह हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत 79 वा स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण व्यासपीठावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वाल्मीकरावजी सुरासे, सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय सेवा निवृत्त संचालक प्रमुख पाहुणे भागवत नाईकवाडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू विजयकुमार मुळे, प्राचार्य बी.एम.हजारे, संचालक दत्तात्रय सुरासे,सरपंच कांताबाई बागुल, आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. दरम्यान व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. गावातून प्रभातफेरी व प्लास्टिक मुक्त भारत यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांची व गावकऱ्यांची मने जिंकली तसेच देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी कवायत व एन.सी.सी विभाग अंतर्गत विद्यार्थ्यांनी संचलन सादर केले.यावेळी मुख्य मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज साळवे तर सूत्रसंचालन प्रमोद.एन.पठारे आभार बी.एम.हजारे यांनी मानले.
यावेळी उपस्थित भरत निंबाळकर,राजेश्वर विभुते, सुनिल भवर,गणेश जगताप, प्रविण जाधव, प्रमोद रिंढे, प्रविण एस जाधव, सागर राजपूत,मनिषा उभेदळ, रोहिदास त्रिभुवन, भारत भोपळे, निर्मला शिरसाठ, गंगाधर कटारे, गोकुळ पवार, योगेश शिंदे, जयश्री बोर्डे, समाधान सुरासे, मंगेश दुतोंडे, दर्शन पाटील, विशाल साबळे,अमोल त्रिभुवन, सुनिल बोडखे,ज्ञानदेव तायडे, किशोर साळुंखे आदी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी गावकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.