श्रीरामपूर:-ड्रोन आढळल्यास संपर्क करा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आवाहन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
ड्रोन आढळल्यास संपर्क करा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आवाहन.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) गेल्या महिन्याभरापुर्वी श्रीरामपुर तालुक्यासह राहाता तालुक्यातील काही भागात ड्रोनद्वारे टेहाळणी करून त्यानंतरच्या चार ते पाच दिवसानंतर त्यांच भागात चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत . यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे कोणत्याही भागामध्ये ड्रोन आढळल्यास अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले आहे गेल्या काही दिवसापूर्वी श्रीरामपुर तालुक्यातील दत्तनगर खंडाळा ‘ निमगाव खैरी ‘ दिघी परिसरात तसेच राहाता तालुक्यांतील रांजणखोल . ममदापुर . वाकडी . नांदूर . राजुरी आदी परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन दिसल्याच्या अनेक घटना घडल्या . अन काही दिवसांतच याच परिसरातून डाळींबाची चोरी घरफोडी ‘ किरकोळ चोऱ्या झाल्या आहेत . परिसरातील काही जागरूक शेतकऱ्यांनी ड्रोन आल्यावर ड्रोनचा पाठलागही केला . परंतु ड्रोनच्या पाटलाग केल्याने ड्रोन दूर जाऊन गायब झाल्याचे दिसून आले . त्यामुळे या ड्रोनचा वापर नेकका कोण करतो ? तसेच त्यातील सिमकार्डसह सर्व माहिती मिळणे गरजेचे आहे . त्यामुळे परिसरात कुठही रात्री ड्रोन आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.