मायणी:-(खटाव)-एक पुस्तक एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकते : प्रविण चाटे
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
एक पुस्तक एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकते : प्रविण चाटे
मायणी प्रतिनिधी
पुस्तकापेक्षा श्रेष्ठ अशी कोणतीही भेट वस्तू असू शकत नाही.एक पुस्तक एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते.त्याला योग्य दिशा देऊ शकते. आणि विचार करणाची प्रेरणा देऊ शकते.असे प्रतिपादन बँक ऑफ इंडिया मायणी ता.खटाव शाखेचे वरिष्ठ शाखा,प्रबंधक प्रवीण चाटे यांनी केले.
मायणी येथील नेहरू वाचनालयास विविध पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठवाचक विश्वनाथ पुस्तके,ग्रंथालय लिपिक सुनिल लोहार,गंथालय सेवक सोमनाथ कांबळे, अधिक लोहार,सागर लांबोळे,मोनू गुप्ता,स्वप्नील मोरे,इंद्रमणी झा,श्रीहर्ष भोसले,रोहन भिसे,गोविंद भिसे,निलेश सकट,जगदीश भिसे आदी उपस्थित होते.
प्रविण चाटे पुढे म्हणाले,आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या काळात ज्ञानाचा आस्वाद घेता येण्यासाठी लोकांना वाचनाची सवय लागली पाहिजे.लोकांच्या व्यक्तीमत्वाच्या पूर्ण विकासासाठी आणि जीवन समृद्धीसाठी वाचनाची गरज असते.लोकांना विविध पुस्तक वाचनाचा आनंद घेता यावा.यासाठी आम्ही काही पुस्तके नेहरू वाचनालयास भेट देत आहोत.याचा मनस्वी आनंद होत आहे.ही पुस्तके भेट देणे म्हणजे केवळ एक वस्तूची देणगी नाही.तर ज्ञानाच्या वाटचालीत छोटं पण महत्वाच पाऊल टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे.मला नम्रपणे सांगावेसे वाटते की, बँक ऑफ इंडिया मायणी शाखेच्या देणगीची सुरुवात असून यापुढेही अशाच प्रकारे आम्ही ग्रंथालयासाठी योगदान देत राहू
.चाटे साहेब यांचा शाल,श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.या स्तुत्य उपक्रमाबद्दल नेहरू वाचनालयाचे अध्यक्ष एस.डी.कुबेर सर,सचिव प्रशांत सनगर यांनी बँक ऑफ इंडिया मायणी शाखेचे अधिकारी,कर्मचारी यांचे आभार मानले.ग्रंथपाल अमोल गरवारे यांनी प्रास्ताविक केले.नेहरू वाचनालयाचे संचालक गणेश गुरव यांनी आभार मानले.