वाई:-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती वाई येथे उत्साहात साजरी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती वाई येथे उत्साहात साजरी.
वाई दि १ :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती वाई शहरात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सामाजिक एकतेचा संदेश देत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ शिवसेना नेते बापूसाहेब शिंदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, वाई नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार खामकर, यशवंत नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघा सावंत, झोपडपट्टी सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष सनी भाई ननावरे, नगरसेवक भारत दादा खामकर, सचिन वायदंडे, संजय सकटे, सुनील भिसे, करण साठे, राजेंद्र सोनवणे, किशोर भगत, नगरसेवक सतीश वैराट, तसेच वाई पोलीस स्टेशनचे ए पी आय ……. गवळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. सनीभाई ननावरे बोलताना म्हणाले केंद्र सरकारने “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न तत्काळ देण्यात यावा अशी जोरदार मागणी केली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: साहित्य, समाजसुधारणा आणि संघर्षाचा प्रेरणास्रोत
अण्णाभाऊ साठे हे मराठीतील एक महान लोकशाहीर, साहित्यिक, समाजसुधारक आणि क्रांतिकारी विचारवंत होते. त्यांच्या साहित्याने दलित, शोषित आणि वंचित वर्गाला योग्य स्थान मिळवून दिले.त्यांनी ललित साहित्य, लोकनाट्य, पोवाडे आणि कथालेखन यामार्फत सामाजिक विषमतेवर प्रहार केला. त्यांची अनेक पुस्तके आजही सामाजिक संघर्षाची प्रेरणा म्हणून वाचली जातात. त्यांनी फड गीते, तमाशा आणि लोकनाट्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत जागृती पोहचवली.
त्यांचे काही प्रसिद्ध साहित्य:
“फकीरा” – एक सामाजिक वास्तव दाखवणारी कादंबरी
“वारी पंढरीची”, “माझी मैना गावावर राहिली” यांसारखी लोककथानुमा सर्जनशील निर्मिती
१२ नाटके, ११ कादंबऱ्या आणि १०० हून अधिक कथा हे त्यांचे लेखन कार्य मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरले.त्यांनी रशियाच्या दौऱ्यावर जाऊन भारतीय कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व केले. रशियन भाषेत त्यांचे साहित्य भाषांतरितही झाले होते, हे त्यांच्या कार्याचे जागतिक महत्व अधोरेखित करते.
कार्यक्रमाची सांगता आणि जनजागृतीचा संदेश
या जयंती सोहळ्यादरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करताना मान्यवरांनी सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीला परिचय करून देणे हे काळाची गरज असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
फोटो खालील ओळी —
दिपप्रज्वलन करताना सरपंच सौ मेघा सावंत, शेजारी बापुसाहेब शिंदे,विराज शिंदे,भारत खामकर व इतर