सातारा:-अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न गुजराती महाजन मंगल कार्यालय सातारा येथे मंगळागौर कार्यक्रम संपन्न.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा:-अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न गुजराती महाजन मंगल कार्यालय सातारा येथे मंगळागौर कार्यक्रम संपन्न.
सातारा: अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न सातारा जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळागौर कार्यक्रम रविवार ३ ऑगस्ट सातारा येथील गुजराती महाजन मंगल कार्यालय येथे पार पडला त्यामध्ये मंगळागौरीची पूजा करण्यात आली .आणि पारंपारिक गाणी खेळ घेण्यात आले .उत्तम प्रकारचे महिलांनी शिंग वादन केले .व उत्तम खेळणाऱ्या महिलांना योग्य ती बक्षीस देण्यात आली .व सातारा महिला टीमला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत साखरे ,मानद अध्यक्ष शिवलिंग क्षीरसागर, महिला प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्रद्धा ताई साखरे ,प्रमुख सरचिटणीस माधवीताई साळुंखे, अध्यक्ष स्मिताताई क्षीरसागर, जिल्हा अध्यक्ष वैशाली पुजारी ,जिल्हा कार्याध्यक्ष रूपालीताई पुजारी यांनी उत्तम कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख महिला उपस्थित होत्या. तसेच लहान मुलींनी लाठीकाठी खेळ, झिम्मा फुगडी खेळ खेळून महिलांनी आनंद साजरा केला.