बावधन:-(वाई)-महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटकची ‘बांधकाम कामगार हक्क व न्याय परिषद सांस्कृतिक भवन* बावधन येथे संपन्न’.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटकची
‘बांधकाम कामगार हक्क व न्याय परिषद सांस्कृतिक भवन बावधन येथे संपन्न’.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना (आयटक, सातारा जिल्हा) यांच्या वतीने दिनांक २ ऑगस्ट 2025 रोजी बांधकाम कामगार हक्क परिषद सांस्कृतिक भवन वाई बावधन येथे संपन्न झाली. रॅली द्वारे व झेंडावंदन करून परिषदेची सुरुवात झाली.
या परिषदेमध्ये बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले.
या परिषदेचे उद्घाटन आयटकचे राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे कॉ. संजय मंडवधरे (राज्य सरचिटणीस) कॉ. भीमा पाटील (कोषाध्यक्ष) आणि कॉ. धनराज कांबळे (राज्य उपाध्यक्ष) यांनी मार्गदर्शन केले.
परिषदेत प्रामुख्याने 1996 च्या बांधकाम कामगार कायद्याची अंमलबजावणी, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे लाभ, त्यातील समस्या आणि राजकीय गैरफायदा, निधीचा दुरुपयोग, बांधकाम कामगारांचे घरांचे प्रश्न आणि पेन्शन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील गैरप्रकार व भ्रष्टाचाराला आळा घालण्यात यावा. वस्तू व स्वरूपात लाभ देण्याऐवजी कामगारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान देऊन भ्रष्टाचाराला पायबंद घालावा. मध्यान्न भोजन योजना पुन्हा सुरू करण्यात येऊ नये व मागील योजनेप्रमाणे भ्रष्टाचाराची कुरण ठरू नये असे प्रमुख ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. यासोबतच, कामगार व कष्टकऱ्यांच्या विरोधात नुकतेच विधानसभा व विधान परिषदेत पारित झालेले जन सुरक्षा विधेयक रद्द करण्याची गरज यावरही विचारमंथन करण्यात आले. तसेच या कायद्याला जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत तीव्र विरोध केला जाईल असे जाहीर करण्यात आले.
या परिषदेत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदेपूर्वी बावधन गावातून बांधकाम कामगार शेतमजूर कामगार कष्टकऱ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकीत बांधकाम कामगार व कष्टकरी कामगार वर्गाच्या विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या.
या परिषदेमध्ये प्रामुख्याने कॉम्रेड सुनील पाटील पालघर, संतोष तेली सिंधुदुर्ग,कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, सोलापूर,संभाजी भेरे, ठाणे, कॉम्रेड बालाजी शितोळे सोलापूर,कॉ.धनाजी गुरव, इचलकरंजी कोल्हापूर, कॉ.भीमराव गवई, बुलढाणा कॉ.संजय बाजड वाशिम, कॉ.जयेंद्र भोगे, कॉम्रेड प्रज्ञा बनसोड अमरावती, कॉम्रेड इब्राहिम पेंढारी,कॉ.मुजावर सांगली, इत्यादी प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. मान्यवरांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध नखाते यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक धनराज कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे हनुमंत पिसाळ हे होते तर प्रामुख्याने सरपंच उदयसिंह पिसाळ, बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गवळी, महिला संघर्ष समितीच्या अध्यक्षा सारिका गवते मॅडम, वाई शहराध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या निशा डाळवाले मॅडम मैत्री फाउंडेशन अध्यक्षा सारिका ननावरे मॅडम ,ग्रामसेवक सपकाळ इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची भागीदारी कॉ.अमित अनपट,कॉ.हितेश साळुंखे,कॉ.अशोक कुचेकर, कॉ.अजित भोसले,कॉ.पंकज चव्हाण ,कॉ.शिवाजी सातपुते,कॉ.सुनील मोरे,कॉ.आरती चव्हाण,कॉ.मनीषा सावंत,कॉ.दत्तात्रय जाधव,कॉ.संगीता राजपुरे, कॉ.सुरेखा भोसले,कॉ.कांता फणसे,कॉ.अर्चना धमाळ,कॉ.नजीर बागवान, कॉ.मारुती शिर्के,कॉ.वैभव कांबळे. व कामगार आदी उपस्थित होते.