साताऱ्यातील महिला वाहतूक पोलिसांचे राज्यभर कौतुक …..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
साताऱ्यातील महिला वाहतूक पोलिसांचे राज्यभर कौतुक …..
सातारा दि: सातारा शहरामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सर्वच वाहतूक पोलीस प्रामाणिकपणाने प्रयत्न करतात. त्याचबरोबर ती कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सुद्धा तेवढ्या तळमळतेने बघतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शस्त्र घेऊन मारामारी करण्याच्या उद्देशाने आलेल्या युवकांना तीन महिला पोलिसांनी गोखले. या गोष्टीचे महाराष्ट्र राज्यभर कौतुक होत आहे.
मोठ्या धाडसाने महिला पोलीस कर्मचारी अर्चना मोहिते, वैशाली लोखंडे, जयश्री बनकर यांनी सातारा शहरातील वाहतुक व्यवस्था पार पाडली . त्याचबरोबर दिवसाढवळ्या कन्नड चित्रपटासारखे डॉनगिरी करणाऱ्या युवकांना कायद्याचा धाकही दाखवला. या बद्दल महिला रणरागिणींचे कौतुक होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही समाधान व्यक्त केले.
स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीने वाहतूक पोलीस दलातील तीनही रणरागिनींना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले .यावेळी सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव ,पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिसाळ, योगेश जाधव तसेच संघटनेचे दिपक कांबळे , महिला जिल्हाध्यक्ष अंजली कदम, भोसले, मधुकर कणसे तसेच इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सातारा शहरात वाढते अतिक्रमण आणि काहींचा पाठिंबा या गोष्टींमुळे वाढती गुंडगिरी व दिसला रस्ता ….कर अतिक्रमण ….ही वृत्ती सातारकरांनी मोडून काढली पाहिजे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे. अशी प्रतिक्रिया उमटत आहे.