पुणे पिंपरी:-डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचा सत्कार हा माझ्यासाठी भारतभूमीचा : श्रीनिवास ठाणेदार
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा सत्कार
हा माझ्यासाठी भारतभूमीचा : श्रीनिवास ठाणेदार
पिंपरी, दि. २२ (शफिक शेख) :- बुद्धिमत्ता आणि शिक्षणपद्धती या दोन बाबींवर महासत्ता बनलेला अमेरिकेतील मी खासदार असलो तरी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाने केलेला माझा सत्कार म्हणजे भारतभूमीचा सत्कार मी समजतो. अशी भावना अमेरिकेतील पहिले मराठी खासदार, संशोधक व उद्योगपती श्रीनिवास ठाणेदार यांनी आज येथे व्यक्त केली.
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी भूषण पुरस्कार आज श्री.ठाणेदार यांना प्रदान करण्यात आला. पिंपरी येथील डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.जे.पवार, कोषाध्यक्ष उदय लाड, सचिन ईटकर, शास्त्रज्ञ डॉ.मकरंद जावडेकर, कल्याण तावरे, डॉ.स्मिता जाधव, डॉ.यशराज जाधव आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी, कल्याण तावरे, डॉ.मकरंद जावडेकर यांचीही भाषणे झाली. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांनी आभार प्रकट केले.
‘वयाच्या ६८ व्या वर्षीच वयाच्या नव्वदीतील नियोजन पूर्ण!’
पराभवाची भीती न बाळगता सतत धोका पत्करणे हीच जीवन पद्धती आपण स्वीकारली असून आज माझे वय ६८ असून पुढील बावीस वर्षांचे जीवनाचे लेखी नियोजन आपले तयार असल्याचे अमेरिकेतील पहिले मराठी खासदार,संशोधक व उद्योगपती श्रीनिवास ठाणेदार यांनी आज येथे म्हटले .
बेळगाव येथील मराठी कुटुंबात अतिशय खडतर जीवन जगलेले व आज अमेरिकेत उद्योजक व खासदार म्हणून काम करत असलेल्या ठाणेदार यांनी आपला सारा जीवन प्रवास या मुलाखतीच्या माध्यमातून उलघडून सांगितला. येथील डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ प्रेक्षागृहात विद्यार्थी आणि तरुणतरुणींनी गर्दीचा उच्चांक मांडला.
भारतातील गरीब विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण अथवा नोकरीसाठी आपण सहकार्य करू तसेच अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी लागणारा कालावधी व किचकट प्रक्रिया यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी म्हटले. डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या संचालिका डॉ. स्मिता जाधव यांनीही विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल अभिमान वाटत असल्याचे म्हटले.