महाबळेश्वर:-सत्य बातमी देणे गुन्हा आहे का ?
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाबळेश्वर:-सत्य बातमी देणे गुन्हा आहे का ?
आरोग्य सुरक्षेच्या नावाखाली महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील जनमानस असुरक्षित.
महाराष्ट्रात प्राथमिक आणि द्वितीय आरोग्य सेवा ही शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे प्रदान केली जाते. तर तृतीय आरोग्य सेवा प्रामुख्याने शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाद्वारे प्रदान केली जाते. महाराष्ट्र शासन देखील महानगरपालिका, नगर परिषदा यांच्या मार्फत शहरी क्षेत्रात प्राथमिक द्वितीय आणि तृतीय आरोग्य सेवा प्रदान केली जाते. शहरात किंवा जिल्ह्यात मोठय़ा लोक संख्येसाठी पुरेशा आणि दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा पुरवण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा व सेवा असणे आवश्यक आहे. तशी सुविधा ग्रामीण तसेच दुर्गम भागात नसते का? आणि असेल तर त्याला अपवाद महाबळेश्वर तालुका असू शकतो का?
स्पष्ट बोलायचे तर महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात आरोग्य सेवेची वानवा दिसत आहे. याला जबाबदार कोणाला धरायचे हा एक मोठा गहीन प्रश्न आहे. महाबळेश्वर तालुक्याने महाराष्ट्र सारख्या प्रगत, विकसित, आर्थिक दृष्ट्या सक्षम राज्याला सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री दिले व सद्य परिस्थितीत कार्यरत आहेत. माननीय मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी केलेली कामे डावलून अथवा काना डोळा करून चालणारी नाहीत. त्यांच्या कामाला आमच्या दुर्गम भागातील जनतेतर्फे सलाम. त्यांनी महाबळेश्वर ते तापोळा रस्ता चौपदरीकरण केला महाबळेश्वर सिटीत पर्यावरण पूरक पर्यटकांसाठी केलेल्या सुविधा, केबल ब्रिज अशी अनेक कामे आहेत जी मार्गी लागलेली आहेत व लागताना दिसत आहेत. परंतु तेथील महाबळेश्वर तापोळा, दरे, आहिर भागाच्या पूर्वेला असणाऱ्या भागात जिवीत हानी झाली तर साध्या दोन खाटांचा दवाखाना देखील नाही ही या भागाची दुर्दशा आहे असे म्हणावे लागेल.
महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम दिशेला असलेल्या झांजवड, दूधगाव, चतुरबेट, गोरोशी, घोणसपूर, देवळी या पंचक्रोशी दरम्यान एकही दवाखाना नाही किंवा उपकेंद्र नाही. जवळपास 20 एक वर्षापासून आम्ही याकरिता पाठपुरावा करत आहोत. याबाबत सन 2009 मध्ये प्रादेशिक अनुशेषाखाली उपकेंद्र दुधगाव तालुका महाबळेश्वर या आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला त्यानंतर अद्याप उपकेंद्राची सुधारित मान्यता ही कागदावरच आहे. सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या विषयाला पाठपुरावा करत असताना थोडीफार चालना मिळाली असे म्हणता येईल.
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागातील सदर पंचक्रोशी दरम्यान रुग्णांना आरोग्य सेवा पासून वंचित राहावे लागत असेल व एखाद्या रुग्णाला गंभीर आजाराकरिता डालग्यातून घेऊन जावे लागत असेल तर ती तालुक्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. स्पष्टच बोलायचे तर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या दरेगावच्या जवळपास असणारे अहिर, तापोळा या गावांच्या दरम्यान 400 ते 500 कोटी रुपये खर्च करून केबल ब्रिज बांधण्यास लगेच मंजुरी मिळते व तत्काळ काम ही सुरू होते तर वरील भागातील जनतेला आरोग्याची सुविधा मिळण्यास वीस-पंचवीस वर्षे वाट का पहावी लागते हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा प्रश्न भागातील जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही.
याबाबत बोलायचेच झाले तर महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी ते तापोळा दरम्यान एकही सुसज्ज असा दवाखाना नाही सर्दी, पडसे, ताप, यावर उपचार करणारे साधारण डॉक्टर एखाद दुसरा असेलही परंतु साप चावणे, हिंसक जनावर चावणे, हिंसक जनावरांचा हल्ला होणे, अपघात, हृदयविकाराचा झटका येणे, पॅरेलेसिस, हातपाय मोडणे यासारख्या गंभीर आजारावर त्वरित उपचार करणारे दवाखाने नाहीत. तापोळा, तळदेव या ठिकाणी आहेत परंतु त्यात पूर्ण सुविधा नाही दवाखाने आहेत परंतु त्यात कधी कधी डॉक्टर देखील नसतात आणि असले तर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी सुविधा नसते यासारखे या भागाचे दुर्दैव नाही. हल्लीच तापोळ्यात एक दुर्घटना घडली हृदय विकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला देण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे 40/ 45 हजाराचे इंजेक्शन देखील उपलब्ध नव्हते. त्या व्यक्तीला तेथून इतरत्र हलवण्यामध्ये वेळच पुरला नाही व त्यावेळेत त्यांनी आपली वेळ देवाला अर्पण केली तयाला काय म्हणायचे ते तुम्हीच ठरवा.
मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना पंचतारांकित दवाखाने उभारले जातात व आहेत परंतु दुर्गम भागातील लोकांसाठी साधे उपकेंद्र नसावे ही शरमेची बाब आहे. मुळात दुर्गम भागातील लोकांमुळे शेतकऱ्यांमुळे आज आपण पोटभर अन्न खाऊ शकतो हे शासन का मान्य करत नाही. सध्या विकासाच्या दृष्टीने गल्लीबोळात रस्ते, हायवे, ब्रिज उभे केले जात आहेत हे लपवून चालणार नाही याची स्तुती केली पाहिजे यात शंका नाही.
परंतु भागातील लोकांनी आमच्या गावात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत रस्ता झाला पाहिजे ह्या, ठिकाणी पूल झाला पाहिजे, त्या ठिकाणी जोड रस्ता झाला पाहिजे असे झाले पाहिजे, तसे झाले पाहिजे करत बसण्यापेक्षा आम्हाला आरोग्या करिता दवाखाना झाला पाहिजे असे म्हटले तर चुकले का? जर आरोग्य सेवेअभावी माणूसच सुरक्षित नसेल तर त्या रस्त्यावरून तसेच त्या सुविधांचा कोण उपभोग घेईल याचे तरी भान ठेवले पाहिजे.
सार्वजनिक आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि प्रत्येक राज्यात आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो मग याच भागात कमतरता का, असो मतदान करून नगरसेवक, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी निवडून देतात. आपल्या भागाचा विकास व सुविधांसाठी निवडून दिले जाते तर मग कामात दिरंगाई का हे विचारण्यासाठी जनता रस्त्यावर आली तर नवल काय आहे असे आता वाटायला लागले आहे. असो शासनाने यात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर दवाखान्याची व्यवस्था करावी जेणेकरून स्थानिक लोकांचे मरण स्वस्त होईल. खूप काही लिहिण्यासारखे आहे परंतु तूर्त एवढेच पुरे असे अनंत जाधव यांनी प्रतिपादन केले आहे.