पारनेर:-सिस्पे, कंपनी विरोधात,सुपा येथे जन अंदोलन!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सिस्पे, कंपनी विरोधात,सुपा येथे जन अंदोलन!
{सिस्पे ह्या बनावट कंपनीने पतसंस्थांचे पदाधिकारी कमिशन एजंट बनवुन,त्यांनाच ५% कमिशन देवुन सर्व सामान्य गुंतवनुक दारांना दर महीण्याला ११% ते १५% पर्यत व्याजपरताव्याचे अमिष दाखवुन सर्व ठेविदारांना पतसंस्था,बॅंकाच्या ठेवी काढण्यास भाग पाडले,}
दि,२८ सुपा;(अहिल्यानगर)
सिस्पे सारख्या बनावट कंपन्या वेगवेगळ्या नावाने बाजारात आल्या ,आणी मार्केटमध्ये ठेविदारांना दरमहा ११% पासुन तर! १५% व्याजपरतावा म्हणुन दर महीण्याला देणार असे अमिष दाखवुन काही काळ हा परतावा दिला ,असे अमिष दाखवत,अहिल्यानगर जिल्यातील पारनेर,श्रीगोंदा पुणे जिल्यातील शिरुर तालुक्यातील जवळपास चार हजार कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवनुक झाल्याचे चित्र आज पहावयास मिळते ,
सिस्पे ह्या बनावट कंपनीचा मुळ सुत्रधार नवनाथ अवताडे,अगस्थी मिश्रा यांच्यासह कंपनीच्या १२ संचालका विरोधात श्रीगोंदा तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे,
कंपनीचा मुळ सुत्रधार नवनाथ अवताडे यांनी तीन वर्षापासुन ही कंपनी चालु केली होती, त्यांनी श्रीगोंदा,पारनेर,कर्जत,शिरुर,दौंड तालुक्यात भरपुर कमिशन देउ केल्याने पतसंस्थाचे कर्मचारी ,अधिकारी बॅंकाचे अधिकारी एजंट म्हणुन सामिल झाल्याने सर्वसामान्य जनता तिकडे आकर्षित झाली, विशेष म्हणजे दरमहा व्याजपरतावा ११% ते १५% पर्यत देणार अशी शास्वती दिल्याने गुंतवनुक दारांनी पतसंस्था,बॅंकातील ठेवी काढुन ह्या फसव्या सिस्पे कंपनी त गुंतवल्या ,काही काळ सांगितल्याप्रमाणे भरपुर असा व्याजपरतावा मिळाला,कमिशन एजंटला ही भरपुर कमिशन मिळाले.
काही दिवसांनी सिस्पे ह्या कंपनीने नावात बदल केला आणी सिस्पे इन्फानाईट नावाने श्रीगोंदा,पारनेर तालुक्यात मल्टीनिधी संस्था सुरु केल्या त्यामुळे गुंतवनुक दारांना विश्वास पटला,नंतर काही दिवसांनी कंपनीने व्याजदर कमी करुन ६% ते ८% वर आनला, अनेकांनी तरी अनेकांनी पतसंस्था,बॅंकातील ठेवी काढुन दरमहा ८% परतावा व्याज मिळते या अमिषाला बळी पडुन ठेविदांरांनी ठेवी ठेवल्या,सदर कंपनीत पतसंस्था,बॅंकाचेच पदाधिकारी हेच ह्या बनावट कंपनीचे एजंट झाले,सर्वसामान्य जनता यांचेकडे आकर्षित होउन गुंतवनुका झाल्या,
याचा मुख्य केंद्रबिंदु पारनेर तालुक्यातील सुपा असुन जास्त गुंतवनुक ही सुपा पंचक्रोशील गावांची झाल्याचे चित्र दिसते कारण सुपा औद्योगिक वसाहतीमधे सर्व सामान्य शेतकरी वर्गाला जमिनीचे लाखावर ,कोटीवर रुपये मिळाल्याने बनावट सिस्पे कंपनीचा केंद्रबिंदु मानल्या गेला.गुंतवनुक दारांमधे शेतकरी वर्ग, बॅककर्मचारी,शिक्षक,इन्वस्टर उद्योगपती राजकारणी,यांचा समावेश आढळुन येतो,
{आठ महीण्यापुर्वी RPS STAR NEWS ,दैनिक लोकमंथन दैनिक,अक्षराज या दैनिकाने सर्व ठेविदारांना अगोदरच सावध केल्याने नविन ठेविदार या बनावट सिस्पे कंपनीतुन वाचला हे पारनेर,श्रीगोंदा,शिरुर ,नगर तालुक्यातील ठेविदारांचे भाग्य च! }
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन