पारनेर:-रोल मॉडेल व्हिलेज बाभुळवाडे मध्ये शिवपाणंद रस्ते मोजणीस प्रारंभ.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
रोल मॉडेल व्हिलेज बाभुळवाडे मध्ये शिवपाणंद रस्ते मोजणीस प्रारंभ.

शरद पवळे – शिवपाणंद रस्ते चळवळीचे ऐतिहासिक यशस्वी पाऊल.
पारनेर ;(राजकुमार इकडे)
शिव पाणंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्यातील शिवपाणंद शेत रस्ते मोकळे करण्यासाठी पारनेर तालुक्यातील रोल मॉडेल व्हिलेज बाभुळवाडे त भुमी अभिलेख उप अधीक्षक माधवराव पाटील यांच्या टिम कडुन प्रत्यक्ष शिवरस्ते व शेतरस्ता मोजणीस प्रारंभ झाला.
शेत तिथे रस्ता,गाव तेथे समृद्धी हे धोरण घेऊन शरद पवळे यांनी शिवपाणंद शेत रस्ते मोकळे करण्यासाठी चळवळ उभारली. राज्यभरात चळवळीचे संघर्ष केला नंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवळे यांच्या चळवळीची दखल घेऊन शिवपाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी निर्णय घेतला, शेत रस्ते मोजणी मोफत केली, पोलिस संरक्षण शुल्क माफ केले. आता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात रोल मॉडेल व्हिलेज संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे हे गाव शिवपाणंद शेत रस्ते मोकळे करण्यासाठी रोल मॉडेल व्हिलेज म्हणून घेण्यात आले.यासाठी शरद पवळे यांनी ग्रामसभा,शिवारफेरी, शेतकरी, अधिकारी संवाद उपक्रम राबविले. आणि आता बुधवारी प्रत्यक्ष शिवरस्ते मोजणी प्रारंभ भुमी अभिलेख उप अधीक्षक माधवराव पाटील,किरण हराळ यांनी सुरू केली.
यावेळी चळवळीचे सुरेश वाळके, पवार तलाठी,
श्री. भिवाजी जगदाळे (मा. . सरपंच ), बाळासाहेब नवले (उपसरपंच ), प्रमोद खणकर (ग्रामपंचायत सदस्य )दिलिप बोरुडे (मा. तंटामुक्ती अध्यक्ष )जयसिंग खणकर (चेरमन ), सौ. निशिगंधा बोरुडे (ग्रामपंचायतसदस्य) सामाजिक कार्यकर्ते गुलाब नवले,बाबुराव पटाडे, दादाभाऊ बोरुडे,दत्तू बोरुडे, बाबाजी बोरुडे, प्रशांत बोरुडे, इंदुबाई बोरुडे, मंगेश खणकर, विलास खणकर, सचिन कामठे, गहीनाजी कामठे आदी उपस्थित होते.
शेत तिथे रस्ता,गाव तिथे समृद्धी ला ऐतिहासिक प्रारंभ
शिव पाणंद रस्ते चळवळ उभी राहिली मुळें आम्ही शेतकऱ्यांच्या समृद्धी साठी आम्ही प्रयत्न करत आहेत. बाभुळवाडे रोल मॉडेल व्हिलेज हे आता राज्यात आदर्श ठरणार असून मोजणीस प्रारंभ झाला मुळे ऐतिहासिक यश मिळाले आहे.
शरद पवळे, प्रणेते, शिव पाणंद शेत रस्ते चळवळ, महाराष्ट्र शिव पाणंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोल मॉडेल व्हिलेज बाभुळवाडे हाती घेतले असून भुमी अभिलेख विभाग वतीने शिवरस्ते,पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी मोजणी सुरू केली आहे. यासाठी ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी सहकार्य केले वर संपूर्ण मोजणी कमी कालावधीत पूर्ण होईल.
माधवराव पाटील,उप अधीक्षक,भुमी अभिलेख विभाग पारनेर.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.