श्रीरामपूर:-प्रदीप मिश्रांचा शिवपुराण कथा महोत्सव शिर्डीत होणार – डॉ सुजय विखे …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
प्रदीप मिश्रांचा शिवपुराण कथा महोत्सव शिर्डीत होणार – डॉ सुजय विखे …..
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) येथे येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या भव्य आणि दिव्य अध्यात्मिक कार्यक्रमात मार्गदर्शन स्वतः परमपुज्य प्रदीपजी मिश्रा महाराज करणार असल्याची माहिती माजी खाजदार डॉ . सुजय विखे पाटील यांनी मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धान येथे जाऊन प्रदीपजी मिश्रा महाराजांची प्रत्यक्ष भेट घेतली . त्यांना शिर्डी येथे येण्याचे औपचारिक आमंत्रण दिले . त्यानंतर येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान शिर्डीत शिवपुराण कथा महोत्सवाला ५ लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून . संपूर्ण शिर्डी परिसर भक्तीमय वातावरणात न्हालेला पाहायला मिळणार आहे . शिवकथा हा केवळ श्रावणाचा सोहळा नसून आत्मशुद्धी आणि जीवनाला दिशा देणारा एक दिव्य प्रकाशस्तंभ आहे त्यामुळे आपण सर्वांनी या पावन महोत्सवात सहभागी व्हावे . असे आवाहन डॉ . सुजय विखे पाटील यांनी केले आहे . शिवकथा महोत्सवाच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंब घेत असून . या कार्यक्रमामागे एक हृदयस्पर्शी प्रेरणा आहे . गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी व अहिल्यानगर परिसरातील माता – भगिनींनी सातत्याने विनंती केली होती की . शिवकथेसारखा आध्यात्मिक सोहळा आपल्या भूमीत व्हावा या भक्तिभावाला सकारात्मक प्रतिसाद देत डॉ . सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.