वाई रोटरी क्लबच्या कार्याचा जगभरात डंका : रो. सुधीर राशिंगकर – कुणाल शहा आणि अनुपम गांधी यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई रोटरी क्लबच्या कार्याचा जगभरात डंका : रो. सुधीर राशिंगकर – कुणाल शहा आणि अनुपम गांधी यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात.
वाई रोटरी क्लबच्या समाजोपयोगी प्रकल्पांमुळे समाजातील विविध गरजू घटकांना भक्कम मदतीचा हात मिळाल्यामुळे त्यांच्या कार्याचा जगभरात डंका वाजत आहे. वाई आणि परिसरातील गरजूंच्या मदतीला अमेरिकेपासून मलेशियापर्यंत सर्वांनी मदतीचा हात दिलेला आहे. वाईनेही अमेरिकेतील गरजूंसाठी प्रकल्प राबवून परतफेड केली आहे. अशाप्रकारे क्लबने सर्व सामाजिक संस्थांसमोर आदर्श कार्याचे उदाहरण ठेवले आहे, असे गौरवोद्गार माजी प्रांतपाल डॉ. सुधीर राशिंगकर यांनी येथे वाई रोटरी क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून काढले. कुणाल शहा यांची नूतन अध्यक्षपदी तर अनुपम गांधी यांची नूतन सचिवपदी समारंभपूर्वक नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर त्यांचे नवीन कार्यकारी मंडळ सन्मानित करून नेमण्यात आले. मावळते अध्यक्ष डॉ. मनोहर दातार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्षांची ओळख डॉ. नितीन कदम यांनी, नूतन सचिवांची ओळख सोनाली हेरकळ-शिंदे यांनी करून दिली. माजी प्रांतपाल आणि वाई क्लबच्या सदस्या स्वाती हेरकळ यांचा विशेष सन्मान डॉ. राशिंगकर यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन अध्यक्ष कुणाल शहा यांनी आपल्या पुढील वर्षभराच्या काळात करण्यात येणाऱ्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. नूतन सचिव अनुपम गांधी यांनी नवीन कार्यकारी मंडळाची ओळख करून दिली. नवीन सदस्यांची ओळख अनुराधा जोशी आणि डॉ. प्रेरणा ढोबळे यांनी करून दिली. सहाय्यक प्रांतपाल डॉ. नरेंद्र शेलार यांची ओळख डॉ. अमर कित्तुरकर यांनी करून दिली. डॉ. राशिंगकर यांची ओळख मदन पोरे यांनी करून दिली. सोनिया मलटणे – वणकुद्रे यांनी संपादित केलेल्या “कृष्णातरंग” या अनियतकालिकाचे प्रकाशन यावेळी झाले. सहाय्यक प्रांतपाल नरेंद्र शेलार यांनी प्रांतपाल डॉ. सुधीर लातूरे यांचा शुभसंदेश वाचून दाखवला. अनुपम गांधी यांनी आभार मानले. डॉ. रूपाली अभ्यंकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला वाई परिसर आणि सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रोटरियन्स उपस्थित होते.