सातारा:-क्षेत्र माहुली नवोदय विद्यालयात वृक्षारोपणातून माँ तुझे सलाम…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
क्षेत्र माहुली नवोदय विद्यालयात वृक्षारोपणातून माँ तुझे सलाम…
सातारा दि: सातारा जिल्ह्यातील
पंतप्रधान जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्रमाहुली, सातारा येथे इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत ‘एक पेड़ माँ के नाम ‘ कार्यक्रमात केला. वृक्षारोपणाच्या विधेयक उपक्रमाने माँ तुझे सलाम पाहण्यास मिळाले.
भारत सरकारच्या पर्यावरण संरक्षण या अभियानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संरक्षण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ७५’बालतरुंचे ‘ रोपण करण्यात आले . निसर्गरम्य परिसरामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे कार्य करून दाखवले आहे.
विद्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांनी व वेलींनी नटलेले आहे . त्यामध्ये या विविध फळझाडे, फुलझाडे व औषधी वनस्पती अशा ७५ विविध वृक्षांनी विद्यालयाच्या सौंदर्यात भर घातली . पावसानेही पाण्याची फवारणी करून निसर्गाला साथ दिली आहे.विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाबरोबरच वृक्षाचे संरक्षण व संवर्धन हे खूप महत्त्वाचे आहे . असा मोलाचा संदेशही सातारा विभागीय वन अधिकारी श्री वाघमोडे यांनी दिला .
दरवर्षी पंतप्रधान जवाहर नवोदय विद्यालयासाठी झाडे उपलब्ध करून देण्यासाठी पालकांचा व विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे . या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग उपस्थित होते .
पंतप्रधान जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ॲन्सी जॉर्ज , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . तसेच एन .सी .सी . स्काऊट आणि गाईड व अन्य विद्यार्थ्यांची उपस्थिती व सहकार्य मोलाचे ठरले .