आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा जि.प.दुर्गम भागातील शाळांची दुरुस्ती केव्हा होणार?

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सातारा जि.प.दुर्गम भागातील शाळांची दुरुस्ती केव्हा होणार?

सातारा दि: बहुजन समाजाला शिक्षणाची द्वारे खुली करणारे कर्मवीर भाऊराव पाटील व शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे आणि असंख्य ग्रामीण भागातील संस्थाचालकाने प्रयत्न केला. परंतु, खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतूनच श्री गणेशा करून कर्तबगार पिढी निर्माण झाली. प्राथमिक शाळेबद्दलची आस्था आजही कायम आहे. परंतु, दुर्गम भागातील जावळी महाबळेश्वर पाटण कोरेगाव कराड फलटण तालुक्यातील काही प्राथमिक शाळेची दुरावस्था पाहण्यास मिळत आहे. या शाळेची दुरुस्ती केव्हा होणार? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ व विद्यार्थी विचारू लागलेले आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये आता नववीचे वर्ग सुरू झाली असून सुविधा बाबतही लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात पूर्वीच्या शिक्षणाची परंपरा खंडित झाली. आता बाराखडी व अंकलिपी , पाटी पेन्सिलच्या जागी लॅपटॉप, मोबाईल, संगणक आले. पण प्राथमिक शाळेचा दर्जा वाढू शकलेला नाही. गुणवत्ताधारक प्राथमिक शिक्षक आहेत. पण, बदली निकष, प्रमाणपत्राचा गैरवापर व वशिलेबाजी मुळे त्यांना योग्य प्रात्यक्षिक शाळेमध्ये संधी मिळत नाही.
बहुतांश प्राथमिक शाळेमध्ये सुविधा नसल्यामुळे अनेक ठिकाणी बाल विद्यार्थ्यांना वरांडात बसावे लागते. खंडित वीज पुरवठ्याने अनेक संगणक यंत्रणा व बॅटरी नादुरुस्त झालेली आहे. काही शाळेचे पत्रे गळत असून फरशा तुटलेले आहेत. मुख्याध्यापकांनी अनेकदा लेखी व तोंडी तक्रार करूनही त्याची निधी अभावी दुरुस्ती झाली नाही.
आता नववीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह महत्त्वाचे आहे. पण काही ठिकाणी त्याची अवस्था बिकट आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये २६८२ प्राथमिक शाळा मधून एक लाख १४ हजार ७७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये पदवीधर शिक्षक ११४६ आहेत तर कार्यरत प्राथमिक शिक्षक ५७३४ आहेत. या आकडेवारी मध्ये सध्या घट झालेली आहे. ही गट भरून काढणे. सध्या तरी अशक्य आहे.
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 साली आला. या गोष्टीला सोळा वर्षे झाली आहे. प्राथमिक शाळेची पटसंख्या एका बाजूला कमी होत आहे तर दुसऱ्या बाजूला शिक्षणापासून काही बालक वंचित राहिलेले आहेत. यामध्ये स्थलांतर व निवारा आणि रोजगाराची सोय नसल्यामुळे अनेक पालक व बालक गाव सोडून जात आहेत. हे त्रिवार सत्य शासन स्वीकारत नाही.
सातारा जिल्हा परिषदेने आदर्श शाळा निर्मितीसाठी २२६ शाळेची निवड केली. मोठ्या प्रमाणात जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध केला .पण आजही ५१३ दुर्गम भागातील काही शाळांमध्ये स्वच्छतागृह नाही. डिजिटल शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. याबाबतही मायक्रो प्लानिंग करून वस्तूस्थिती समोर आणणे गरजेचे आहे.
सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिरकावामुळे ग्रामीण भागातही जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देताना तिसरे अपत्य असेल तर उमेदवारी मिळत नाही. त्याच धर्तीवर मग सुधारणा करून किमान एक पाल्य तरी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असावा. अशी इच्छुक उमेदवारी देताना अट घालण्याची सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे. याबाबतही शासनाने विचार करावा. अशी मागणी पुढे आलेले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नववी वर्गाचे सर्वत्र स्वागत करण्यात येईल परंतु कोडोली व कोलेवाडी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता व इतर सुविधांबाबत लेखी परीक्षेनंतरच खरा निकाल लागेल. असेही काही पालकांनी स्पष्ट केले.

महत्त्वाची चौकट —-
अनेक सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या खोल्यांना भेगा पडल्या आहेत, पत्रा सडला आहे. कौले फुटली आहेत, आणि पावसाळ्यात भिंती फरशी झिरपत आहेत. रंग उडाला आहे. अनेक शाळांमध्ये खिडक्या आणि दारे, बेंच तुटलेली आहेत, अतिवृष्टी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात त्रास होत आहे. मोकाट जनावरे सुद्धा काही वेळेला शाळेची आवारात हिंडत असतात.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button