श्रीरामपुर ‘ शिर्डी:-संगमनेर येथे धडाकेबाज कामगिरी बजावणारे सोमनाथ वाकचौरे श्रीरामपुरच्या अप्पर पोलिस अधीक्षक …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपुर ‘ शिर्डी:-संगमनेर येथे धडाकेबाज कामगिरी बजावणारे सोमनाथ वाकचौरे श्रीरामपुरच्या अप्पर पोलिस अधीक्षक …..
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) डीवायएसपी म्हणून श्रीरामपुर शिर्डी व संगमनेर येथे चोख कामगिरी बजावणारे धडाकेबाज पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांची आता बढती होऊन श्रीरामपुरचे डीवायएपी असतांना येथील गुन्हेगारी ‘ राहुरीतील गुन्हेगारी व अवैध धंदे यांच्यावर मोठ्या कारवाया सोमनाथ वाकचौरे यांनी केल्या शिर्डीत डीवायएसपी असतांना तेथील गुन्हेगारी ‘ अवैध धंदे व साईबाबांच्या भक्तांना फसविणाऱ्या धडा शिकविला होता. त्यानंतर संगमनेर येथे डीवायएसपी म्हणून काम करतांना सोमनाथ वाकचौरे यांनी मुंबई कल्याण,ठाणे परिसरात संगमनेर येथील कत्तल खान्यांतून गोमांस वर्षानू वर्षे बिनबोभाट जात होते . गोवंश हत्या बंदि कायदा असतांनाही संगमनेरात मोठे कत्तलखाने सुरू होते. त्यावर प्रथमच मोठ्या कारवाया करत सोमनाथ वाकचौरे यांनी केल्या व तेथील गोमांस तस्कराचे कंबरडे मोडत कत्तलखाने मोडून – उखडून टाकले.तेव्हा त्यांच्यावर राजकारण्यांनी मोठा दबाव आणला पण सोमनाथ वाकचौरे यांनी त्याला भिक घातली नाही व शांतताप्रिय नागरिकांनी वाकचौरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले होते. त्यांना तेव्हा एसपी राकेश ओला यांची साथ लाभली.
आता तर जबरदस्त कामगिरी करत असलेले एसपी सोमनाथ घार्गे हेही श्रीरामपुरला डीवायएसपी म्हणून कामगीरी केलेले असल्याने व दोन्ही ” सोमनाथानां श्रीरामपूर – राहुरी येथील कोण कसा आहे हे चांगलेच माहीत असल्याने आता एसपी सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यामुळे दक्षिणेत व उत्तरेत गोमांस तस्कर व व्हाईट कॉलर गुन्हेगार,अवैध धंद्यावाले, गुंड टोळ्या यांना वाईट दिवस आल्याचे स्पष्ट होत आहे हा एक योगा – योग आहे. एसपींचे नाव सोमनाथ व अप्पर पोलीस अधिक्षकांचे नाव ‘ सोमनाथ म्हणजे जिल्हाची कायदा व सुव्यवस्था दोन्ही सोमनाथांच्या हाती सोमनाथ वाकचौरे यांना RPs स्टार न्युज यांच्या कडून हार्दिक शुभेच्छा.