पुणे:-( आंबेगाव कात्रज )-किरणा दुकानामध्ये गुटखा व सिगारेट विकणाऱ्यावर आंबेगाव पोलीस स्टेशनने केली बेधडक कारवाई.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
किरणा दुकानामध्ये गुटखा व सिगारेट विकणाऱ्यावर आंबेगाव पोलीस स्टेशनने केली बेधडक कारवाई.
आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हददीत दिनांक २५/०६/२०२५ रोजी आंबेगाव ब्रु, व कात्रज भागात पुणे या ठिकाणी असलेल्या किराणा दुकानात व टपरीवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला आर.एम.डी, विमल पान मसाला गुटखा विक्रीसाठी साठा करुन ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने आंबेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आंबेगाव पोलीस स्टेशन हददीत ४ ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली. सदर कारवाई दरम्यान एकूण ४९,९००/- रुपये किंमतीचा गुटखा व सिगारेट जप्त करण्यात आला सदर कारवाईत मालाची विक्री करणेकरीता साठा करून ठेवणारे १) राहुल प्रकाश संचेती, वय ३२ वर्षे, २) प्रमोद प्रकाश संचेती, वय ३६ वर्षे, ३) रविंद्र राजकुमार वाकडे, वय २६ वर्षे, ४) सुनिल दगडू सुरवसे, वय २४ वर्षे, ५) प्रशांत बच्चा कुलाल, वय ४१ वर्षे, यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द आंबेगांव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम ३० (२) (अ), २६ (२) (१), २६ (२) (४) अंतर्गत कलम ५९, जाहिरातीस प्रतिबंध आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा अधिनियम २००३ चे कलम ७ (२), २० (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ पुणे, श्री. राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गजानन चोरमले, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, बाबासो पाटील, निलेश जमदाडे, अजय कामठे, हरीष गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, अविनाश रेवे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, यांच्या पथकाने केली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन