कराड:-(धावरवाडी)-श्री भैरवनाथ आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्यास उद्या प्रारंभ.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री भैरवनाथ आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्यास उद्या प्रारंभ.
श्री क्षेत्र धावरवाडी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा.
ता.कराड येथील श्री भैरवनाथ आषाढी पायी दिंडी सोहळा गेली दोन वर्षे श्रीक्षेत्र धावरवाडी ते श्री शेत्र पंढरपूर पायी दिंडी चे उद्या दिनांक 24 जून 2025 रोजी प्रस्थान होणार आहे.
कराड तालुक्यातील धावरवाडी येथील श्री भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला प्रस्थान होणार आहे तरी भागातील सर्व वारकऱ्यांनी व ग्रामस्थांनी दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सामील होण्यास आव्हान केले आहे.
श्री भैरवनाथ दिंडी सोहळ्याचे चालक ह.भ.प छगन महाराज व दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक मधुकर महाराज वारकरी मंच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी तसेच समस्त ग्रामस्थ धावरवाडी यांनी गेली दोन वर्ष मोठ्या संख्येने हा दिंडी सोहळा उंब्रज, माळवाडी ,चोराडे,मायणी, झरे, दिघंची,चिकमहुद, महिम,उपरी, गादेगाव ते पंढरपूर या प्रत्येक गावामध्ये मुक्कामी कीर्तन सेवा आयोजित केल्या आहेत या सोहळ्याचे विणेकरी दादा सुतार, अर्जुन शेळके, संभाजी शेळके, जयराम कोरडे, चोपदार शामराव कदम व सर्व युवक कार्यकर्ते धावरवाडी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
सदरच्या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन दिंडी चालक व मौजे धावरवाडी ग्रामस्थांनी यशस्वीरित्या केल्याबद्दल परिसरातील वारकरी बांधवांकडून कौतुक करण्यात येत आहे.