कळंभे:-(वाई)-शिवसह्याद्री महिला ग्राम संघ कळंभे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व ग्रामपंचायत कळंभे यांची महिला ग्रामसभा संपन्न.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कळंभे:-(वाई)-शिवसह्याद्री महिला ग्राम संघ कळंभे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व ग्रामपंचायत कळंभे यांची महिला ग्रामसभा संपन्न.
तहसीलदार कार्यालय वाई, ग्रामपंचायत कळंभे,श्री शिवसह्याद्री महिला ग्रामसंघ कळंभे , श्री.डी.एम.गायकवाड स्वस्त धान्य दुकानदार कळंभे ता.वाई जि.सातारा यांचे संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कळंभे गावातील नोंदणीकृत सर्व १८ महिला बचत गटांचा असणारा श्री.शिवसह्याद्री महिला ग्रामसंघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सदरील सभेमध्ये कळंभे गावच्या सीआरपी सौ.नुतन बाबर,कृषीसखी सौ.उल्का शिवथरे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. गावातील सर्व बचत गटांचा सभासद मासिक निधी संकलन,कर्ज वितरण, शासकीय अनुदान,राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज यांचा एकूण समिश्र व्यवसाय असा सुमारे ४५ लाख रक्कमेची उलाढाल असुन श्री.शिवसह्याद्री महिला ग्राम संघाचा वार्षिक व्यवसाय पाच लाख पन्नास हजार रुपये आहे.
तद्नंतर ग्रामपंचायत कळंबे यांचे महिला ग्रामसभा संपन्न झाली सदरील सभेमध्ये इतर शासकीय सर्व योजना त्यामधील पात्र लाभार्थ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रापंचायत कळंभे यांचे वतीने केले.
तसेच तहसील कार्यालय वाई, ग्रामपंचायत कळंभे,रेशनिंग दुकानदार श्री.डी.एम.गायकवाड स्वस्त धान्य दुकानदार कळंभे यांचे संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी महाराजस्व अभियान अंतर्गत कळंभे गावातील ८० महिला कुटुंब प्रमुखांना नवीन शिधापत्रिका वितरण करण्यात आले.तसेच कळंभे गावातील संजय गांधी निराधार योजनेचे ५२ वे लाभार्थी सौ. विमल बाळासाहेब शिवथरे यांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत मंजुरी आदेश वाटप करण्यात आले.
कळंभे गावातील गुणवंत तरुण सत्कारमूर्ती कु.आशुतोष वनिता विजयकुमार शिवथरे यांची भारतीय वायुदलामध्ये फाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच कु. प्रणव स्वाती संजय शिवथरे यांची मुंबई उच्च न्यायालय येथे अँडव्होकेट/ वकील पदवी संपादन केल्याबद्दल ग्रामपंचायत कळंभे यांचे वतीने सन्मान करण्यात आला .तसेच कळंभे गावच्या आदर्श सरपंच सौ.ज्योती प्रमोद गायकवाड यांचे वतीने देखील दोन्ही कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला सदरीलप्रसंगी ऑफिसर आशुतोष शिवथरे,सौ.वनिता शिवथरे ,स्वाती संजय शिवथरे यांनी उपस्थित माता भगिनींना आपले मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण व नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.तसेच शिवसह्याद्री महिला ग्रामसंघाच्या लिपीका म्हणुन सौ.निवेदिता सुतार निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचाही ग्रामपंचायतीचे वतीने सन्मान करण्यात आला.
तद्नंतर ग्रामपंचायत कळंभे यांचे वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन २०२५ हा कळंभे गावच्या अंगणवाडी सेविका सौ.दिपाली शिवथरे व सौ. दिपाली नलवडे,सौ.अलका सुतार यांना अधिकृतरित्या प्रदान करण्यात आला.
तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सदरील ग्रामसभेत उपस्थित महिलांना योगाभ्यासाचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिक दाखवुन कृषी विभागाचे तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
सदरीलप्रसंगी आमचे मार्गदर्शक व ज्येष्ठ नेते श्री.डी.एम. गायकवाड स्वस्त धान्य दुकानदार कळंभे यांनी ग्रामपंचायत कळंभे व गावांमध्ये सुरू असलेले विविध विकासकामे व उपक्रम, शासकीय योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायत कळंभे यांचे वतीने देणेत असलेला लाभ याविषयी मार्गदर्शन केले तसेच ग्रामपंचायत कळंभेचे सर्व पदाधिकारी यांचे सामूहिक प्रयत्नातून झालेल्या व सुरू असलेल्या विकासकामांचे उपक्रमाचे कौतुक करून शुभाशीर्वाद दिले.
प्रसंगी भुईंज प्रभाग संघाच्या सचिव सौ. प्रियाताई शिंगटे, एफएल(आर्थिक साक्षरता सचिव)सीआरपी सौ.वर्षा बाबर, योगशिक्षक श्री डेरे साहेब,आमचे मार्गदर्शक धर्मु(आण्णा) मुकिंदा गायकवाड स्वस्त धान्य दुकानदार कळंभे, गावच्या सरपंच सौ.निलम शिवथरे, उपसरपंच सौ.शकुंतला चव्हाण,आदर्श सरपंच सौ. ज्योती गायकवाड, माजी सरपंच सौ.सारिका गायकवाड, माजी उपसरपंच श्री.आबाजी सुतार,माजी उपसरपंच श्री. प्रकाश बाबर,अंगणवाडी सेविका सौ.दिपाली नलावडे, सौ.दिपाली शिवथरे,आशा सेविका सौ. साधना गायकवाड, सीआरपी सौ.नुतन बाबर, कृषीसखी सौ.उल्का शिवथरे,योजना दुत सौ.कविता जाधव, शिवसह्याद्री महिला ग्रामसंघ कळंभे घ्या अध्यक्षा सौ.दिपीका शिवथरे,महसुल सेविका सौ.भाग्यश्री.वेदपाठक,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.आश्वीनी वाघ,महिला तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा सौ.सिमा जाधव,संजय गांधी निराधार पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षा उज्वला शिवथरे,ग्रा.प.कर्मचारी दिलीप वाघ व गावातील सर्व बचत गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सुमारे २५० सभासद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सदरील ग्राम संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वांना शिवसह्याद्री महिला ग्राम संघाच्या वतीने अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आलेले होते.
सदरील ग्रामसभेला, ग्राम संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांचे आभार व अभिनंदन मानण्यात आले.