ताज्या घडामोडी

वाई:-किसन वीर महाविद्यालय परिसरात नानेटी सापाला जीवदान

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

वाई दि. 20
किसन वीर महाविद्यालय परिसरात नानेटी सापाला जीवदान.

वाई येथील किसन वीर महाविद्यालय परिसरात (स्ट्रिप्ड किल बॅक) नानेटी नावाचा साप श्री. रविंद्र जमदाडे आणि श्री. संदीप कदम यांना आढळून आला. वाईतील “वारा” संस्थेचे सर्पमित्र शाहरूख पटेल, यांना बोलवून हा साप पकडण्यात आला आणि सर्प मित्र श्री. रवी पवार, अंकुश पवार,अजिज शेख व वनविभागाचे श्री. मोरे, चौगुले यांच्या मदतीने त्याला नैसर्गिक आधीवासामध्ये सोडण्यात आले. याप्रसंगी प्राणीशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक श्री. राहुल तायडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की नानेटी हा ४० सें.मी सरासरी लांबी असलेला बिनविषारी साप आहे. पानथळजागी, गवताळ भागात आढळतो. या सापाचे खाद्य उंदीर, बेडुक, सरडे असते.
याप्रसंगी किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले साप शेतकऱ्यांचा मित्र आहे तसेच निसर्गातील अन्नसाखळी मधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, साप शेतामधील उंदरांचा नायनाट करतात. त्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते. या सापांबद्दल समाजामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button