ताज्या घडामोडी

साताऱ्यातील शाहिरी महोत्सवाचे आयोजन ब्रेक डांसरकडे,, मंत्र्याकडेच झाली तक्रार…….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यातील शाहिरी महोत्सवाचे आयोजन ब्रेक डांसरकडे,, मंत्र्याकडेच झाली तक्रार…….

सातारा दि: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पोवाडा, जलसा आणि शाहिरी कलेच्या शब्दाने मराठी माणसांना लढण्याचे बळ देणारे अनेक शाहीर होऊन गेले. त्यामध्ये लोक शाहीर पुंडलिक फरांदे व लोकशाहीर साबळे या सातारच्या भूमिपुत्रांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांना सन्मान देण्याऐवजी साताऱ्यात भाजपच्याच एका ब्रेक डान्सरच्या उपस्थितीत शायरी महोत्सव साजरा झाल्याचे आता सर्वत्र टीका होऊ लागलेली आहे.
याबाबत आनेवाडी तालुका जावळी येथील लोकशाहीर पुंडलिक फरांदे प्रतिष्ठानच्यावतीने वयोवृद्ध शाहीर आणि कलावंतांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
याबाबत माहिती अशी की, सातारा येथील शाहू कला मंदिर या ठिकाणी गेले दोन दिवसापासून शायरी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच घुसखोरी केली . हा महोत्सव म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पदासाठी चाललेल्या संगीत खुर्चीचा मेळावा असे याचे स्वरूप आले होते.
सातारा जिल्ह्यामध्ये शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने शंभर ते दीडशे स्थानिक कलावंत व शाहीर परिश्रम घेत असतात. परंतु, त्यांना डावलून पाश्चात्य संगीतावर शुल्क आकारणी करून ब्रेक डान्स करणाऱ्या काही व्यावसायिक कलावंतांचा सहभाग नोंदवून सुद्धा त्याला फारसा शाहिरी महोत्सवाला प्रतिसाद मिळाला नाही.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मौन धारण केले. कारण, या शाहिरी महोत्सवाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे होते. त्यामुळे आपलेच दात आणि आपलेच ओठ… असे समजून हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्यातच मंत्री महोदयांनी धन्यता मानली. अशी माहिती शाहीर यांनी दिली.
लोकशाहीर पुंडलिक फरांदे प्रतिष्ठानच्यावतीने शाहीर प्रकाश फरांदे, वैभव फरांदे, विजय खांडेकर, अमर गायकवाड यांनी मंत्री महोदयांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली व त्यांना निवेदन दिले.
साताऱ्यात सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त कोंबड कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते बांग देतो. याची प्रचिती या निमित्त पाहण्यास मिळाली.
भारतीय संस्कृतीचा नेहमीच उठताना– बसताना गौरव करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता शायरी महोत्सवातही ब्रेक डान्सर ची गरज निर्माण झाल्यामुळे वयोवृद्ध व ग्रामीण भागामध्ये लोककला सादर करणाऱ्या शाहिराने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button