क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी पोलिसांचा भोंगळ कारभार, गुन्हेगार निर्धास्त.

ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके सातारा

मायणी पोलिसांचा भोंगळ कारभार, गुन्हेगार निर्धास्त.
प्रतिनिधी __मायणी
दि.१३. मायणी पोलिसांचा सद्यस्थितीचा कारभार पाहता एका भयानक स्थितीची प्रचिती येते.
मायणी पोलिस स्टेशन हे वडुज पोलिस स्टेशनच्या आधीन आहे. या पोलिस स्टेशनसाठी एक पोलिस निरीक्षक तसेच एक असिस्टंट पोलिस निरीक्षक तसेच कर्मचारी वर्ग आहे परंतु सध्या मायणी भागात होत असलेल्या गुन्ह्याचा तपशील पाहता मायणी पोलिसांचे गुन्हेगारांना वरदान आहे की काय? तसेच वरीष्ठ पोलिस अधिकारी यांचे सुद्धा यांना पाठिंबा आहे की काय ?अशी कुजबूज ग्रामस्थांमध्ये होत आहे. असा पोलिसांचा कारभार पाहता यावर कुणाचाच अंकुश नाही असे दिसून येत आहे यामुळे मायणीत वाळू तस्करी,मटका तसेच इतर गुन्हे राजरोसपणे चालत आहेत अशी माहिती गोपनीय सूत्र कडून मिळत आहे तसेच सामान्य नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जात नाहीत आणि तशी चर्चा ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात होत आहे.
मायणी भागालगत ३६ गावे आणि त्या गावात नद्या ,ओढे आहेत त्यात मायणीतील चांद नदी, चितळी गावातील येरळा नदी ,तसेच मायणी लगत ओढे आहेत त्यात मुबलक प्रमाणात वाळू आहे या वाळूची तस्करी रात्रीच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात होते त्यात भिकवडी गावातील ओढ्याची वाळू खूप मोठ्या प्रमाणात मायणी भागात आणली जाते यावर मायणी पोलिस जाणीवपूर्वक डोळे झाकून दुर्लक्ष करीत आहेत अश्या वर्तनामुळे मायणी पोलिस हे संबंध गुन्हेगारानशी काहीतरी आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत की काय अशी भावना जनसामान्य नागरिकांच्या मनात उद्भभवत आहेत यावर मा.जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मायणी व मायणी परसरतील नागरिक करीत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button