कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी येथे असंघटित कामगार मेळावा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मायणी येथे असंघटित कामगार मेळावा उत्साहात संपन्न.

मायणी प्रतिनिधी___राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मायणी येथे असंघटित कामगार मेळावा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास कामगार सहाय्यक आयुक्त सातारा दिसले साहेब तसेच माजी आमदार दिलीपराव येळगावकर युवा नेते सचिन गुदगे उपसरपंच जगन्नाथ भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना दिसले साहेब यांनी सांगितले की कामगारांच्या कल्याणासाठी शासनाने विविध योजना राबवलेल्या असून कामगारांना हक्काची घरे मुलांना शिक्षण पाच हजार रुपये अनुदान पत्नीच्या प्रसुतीसाठी अनुदान अशा अनेक योजना असून कामगार बंधूंनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले यावेळी बोलताना डॉक्टर येळगावकर म्हणाले बांधकाम व्यावसायिक कामगार शेतात काम करणारे हात भाजीपाला फळे विकणारी विक्रेते वाहन चालक हमाल घरेलू कामगार या सर्वांना संघटित करून त्यांची शासन दरबारी नोंद करून शासनाच्या सोयी सुविधा देण्याबाबत मी कटिबद्ध राहीन अशी त्यांनी ग्वाही दिली यावेळी युवा नेते सचिन गुदगे म्हणाले की पृथ्वीही शेषाच्या मस्तकावर उभी नसून कामगारांच्या हातात विसावली आहे कामगारांचे कल्याण हाच माझा ध्यास आहे येथून पुढे कामगाराची हित माझे हित समजूनच मी काम करणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी जालिंदर माळी नितीन पडळकर नवनाथ गाढवे राजाराम कचरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली या मेळाव्यास 500 पेक्षा जास्त असंघटित कामगार उपस्थित होते शेवटी राजू कचरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button