ताज्या घडामोडी

पारनेरला उभे राहणार स्मार्ट बसस्थानक -आमदार काशिनाथ दाते.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

पारनेरला उभे राहणार स्मार्ट बसस्थानक -आमदार काशिनाथ दाते.

पारनेर बसस्थानक पुर्नबांधणी भूमिपूजन संपन्न.

गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर बस स्थानकाचा प्रश्न प्रलंबित होता शासन स्तरावर पाठपुरावा करून या बस स्थानकासाठी निधी प्राप्त झाला आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा प्रश्न मार्गी लागला आहे पारनेर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आता स्मार्ट बस स्थानक नक्कीच उभे राहील असे मत आमदार काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केले.

पारनेर येथील बसस्थानकाच्या पुर्नबांधणी कामाचे भूमिपूजन आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते संपन्न झाले. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पासाठी 2 कोटी 66 लाख 50 हजार 875 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या अद्यावत बसस्थानकाच्या इमारतीमुळे पारनेर शहराच्या वैभवात भर पडणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर बसस्थानकाची दुरवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. सर्व सुविधांनी युक्त अशी आधुनिक इमारत उभारण्याची तालुक्यातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी होती.

आमदार काशिनाथ दाते यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे

नवीन इमारतीमुळे प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ होणार असून, शहराच्या सौंदर्यातही भर पडेल.या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव सावंत, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, ज्येष्ठ नेते वसंत चेडे, सुभाषराव दुधाडे, भास्कर उचाळे, अर्पणा खामकर, नगरसेवक युवराज पठारे, कांतीलाल ठाणगे, अशोक चेडे, सरपंच लहू भालेकर, मनोज मुंगसे, विकास पवार, उद्योजक मंगेश औटी, राजू औटी, सोनाबाई चौधरी, उपअभियंता काळभोर, आगार प्रमुख प्रशांत काळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्य परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे पारनेरच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांनी आमदार दाते यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, लवकरच आधुनिक बसस्थानकाचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button