वेरूळ:-श्री.घृष्णेश्वराचे घेतले भाविकांनी उत्साहात दर्शन”
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
श्री.घृष्णेश्वराचे घेतले भाविकांनी उत्साहात दर्शन”
पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी…..
वेरूळ दि – 5
वेरूळ येथील प्रसिद्ध बारावी ज्योतिर्लिंग असलेले श्रीघृषणेश्वराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी हर हर महादेवाच्या जयघोषात पहाटेपासून दर्शन घेतले. सोमवारी दिवसभर भाविकांची मांदियाळी मंदिर परिसरात होती
शहरातून, खेड्यापाड्यातून आणि परराज्यातून भाविक दर्शनासाठी आले होते. बॅरिकेट्स आणि येण्या- जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्ग चालू केल्यामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन घेता आले. मंदिर परिसरातील आवारात भाविकांसाठी दानशूर भाविकांनी फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे, खाजगी सुरक्षा रक्षकांसह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांना पहाटे चार ते सात वाजेपर्यंत दर्शनासाठी दक्षिण द्वार खूले केले होते.
( विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी सकाळी श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.)