स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी येथे विविध उपक्रम.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

सातारा :-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी येथे विविध उपक्रम.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त सातारा तालुक्यातील श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संचलित न्यु इंग्लिश स्कूल पिलाणी मजरे या विद्यालयात हर घर तिरंगा महोत्सव उपक्रम जन जागृती करण्यासाठी प्रभातफेरी निबंध स्पर्धा.चित्रकला स्पर्धा.रांगोळी स्पर्धा.वाचन व घोषवाक्य या विषयावर विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत शाळा व्यवस्थापन समिती ची बैठक घेऊन हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव उपक्रम जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले शैक्षणिक विकासासाठी विद्यार्थी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असून विविध प्रकारच्या माध्यमातून समाजप्रबोधन लोकजागृती जन प्रबोधन करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक एस.व्ही.खराते सर यांनी सांगितली या उपक्रमात शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी.पालक तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक यांनी सहभाग व उपस्थित दर्शविली