पुणे:-“हक्कासाठी एकत्र आलोय! – पुणे वारजे आणि मुंबईतील आझाद मैदानावर मातंग समाजाचे महाआंदोलन”
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
“हक्कासाठी एकत्र आलोय! – पुणे वारजे आणि मुंबईतील आझाद मैदानावर मातंग समाजाचे महाआंदोलन”
पुणे | २० मे २०२५
अन्यायाविरुद्ध निर्धाराने उभा ठाकलेला मातंग समाज, २० मे रोजी पुणे शहरातील वारजे परिसरात भव्य मोर्चाच्या रूपात एकवटला. शिस्तबद्ध पद्धतीने, शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून पुणे वारजे येथील तमाम मातंग बांधवांनी उपवर्गीकरणासाठी आपल्या हक्काचा आवाज उठवला.
सर्व वयोगटांतील सहभागी आंदोलकांनी हातात फलक, झेंडे घेऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या. “आरक्षणात न्याय हवा, अन्यथा रस्त्यावर रणकंदन होईल!” असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
या आंदोलनाची धग मुंबईच्या आझाद मैदानात दिसून आली. “सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य” तर्फे आयोजित जन आक्रोश महाआंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक सहभागी झाले.
या आंदोलनाच्या निमित्ताने खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या:
अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) तात्काळ लागू करावे
न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी
मातंग समाजाला शैक्षणिक व सामाजिक स्तरावर न्याय द्यावा
सरकारला अंतिम इशारा:
जर जून २०२५ पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
हे आंदोलन समाजाच्या संघटनशक्तीचा, शिस्तीचा आणि संविधानिक मार्गाने हक्क मिळवण्याच्या लढ्याचा एक सशक्त आवाज आहे.
या आंदोलनात खालील मंडळी उपस्थित होते व सर्वांनी उपवर्गीकरणाची जोरदार मागणी केली:
कल्याण मुळे, संजय गायकवाड, भागवत हातागळे,
सुंदर भिसे, विष्णू खंडागळे, आप्पा लांडगे, उमाप मामा
(मातंग समाज, वारजे माळवाडी, पुणे)