कराड:-भाजप सातारा निष्ठावंताची कराडमध्ये सदस्यता नोंदणी अभियानात चमकदार कामगिरी…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
भाजप सातारा निष्ठावंताची कराडमध्ये सदस्यता नोंदणी अभियानात चमकदार कामगिरी…
कराड दि: सब का साथ.. सब का विकास.. हे घोषवाक्य घेऊन भारतीय जनता पक्षाने भारतीयांची मान उंचावलेली आहे. सातारा जिल्ह्यात भाजप सातारा निष्ठावंत नगरसेवक सुनील काळेकर यांनी कराडमध्ये भाजप सदस्याच्या नोंदणी अभियानात चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भाजपा सदस्यता नोंदणी अभियान अंतर्गत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ तसेच कराड शहर या ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील(दादा)कदम यांच्या सूचनेनुसार भाजपा सदस्यता नोंदणी अभियान सुरू झाले आहे.
कराड तालुक्यातील पहिले भाजप आमदार डॉ.श्री.अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्षश्री.विक्रम पावसकर,भाजपा कराड शहराध्यक्ष श्री.एकनाथ बागडी, यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान उत्साहात पार पडले.
या वेळी एकाच दिवशी कराड द ग्रेट नगरीत भाजप पक्षामध्ये तेराशे नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली.यावेळी सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रभारी या नात्याने सातारा नगरपालिकेचे नगरसेवक व भाजप निष्ठावंत सुनील काळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कराड शहराची बैठक घेऊन आढावा घेतला.
भारतीय जनता पक्षाच्या सकारात्मक संघटनेत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. प्रभारी सुनील काळेकर यांनी भाजपच्या जर्य धोरणाची माहिती घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सामील व्हावे व देश सेवा करावी असे मनोगत स्पष्ट केले.
सातारा शहरातील भाजप युवा नेते व भाजप माजी सातारा शहर अध्यक्ष तथा प्रभारी सुनील काळेकर यांनी डॉ. गजाभाऊ कुलकर्णी ,भरत पाटील, अविनाश फरांदे ,जयकुमार गोरे अशा अनेक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर परिसरात भाजप वाढवण्याचे काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे महायुतीचे आमदार निवडून आणण्यासाठी त्यांनी आटोकाट प्यत्न केले. त्यांच्या या कामगिरीचे भाजप पक्षश्रेष्ठींनी कौतुक करून त्यांना भविष्यात मोठी संधी मिळणार आहे असे भाजप गोटातून बोलले गोटातून बोलले जात आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
फोटो -कराड तालुक्यात भाजप सदस्य नोंदणी अभियानात मार्गदर्शन करताना युवा नेते सुनील काळेकर व आ. डॉ. अतुल भोसले (छाया- अजित जगताप ,कराड)
.