आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा शहरवासीयांच्या सेवेसाठी ‘उमेद मार्ट’ पुन्हा नव्या जोमाने सुरु.

पत्रकार सुप्रिया पाटसूपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष:-8459060701

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार सुप्रिया पाटसूपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष

सातारा शहरवासीयांच्या सेवेसाठी ‘उमेद मार्ट’ पुन्हा नव्या जोमाने सुरु.
‘उमेद’ – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित महिला स्वयंसहाय्यता म्हणजेच महिला बचत गटांच्या सदस्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशासाठी सातारा तालुका पंचायत समिती, सातारा येथे चार व्यापारी गाळे बांधण्यात आलेले होते. सदरील गाळ्यांमध्ये कालानुरूप योग्य ते नूतनीकरण करून, सदरील गाळ्यांचा पुनरारंभ सोहळा १ ऑगस्ट २०२३ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ज्ञानेश्वर खिलारी यांच्या शुभहस्ते संपन्न घडला.
उमेद – अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात बचत गटांची चळवळ जोमाने सुरु आहे. महिला बचत गटातील महिला बचत गटाच्या माध्यमातून गटांतर्गत कर्ज, बँकेमार्फत कर्जपुरवठा तमेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेवून उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण वस्तू बनवणे तसेच अन्नप्रक्रिया उद्योग या क्षेत्रांमध्ये महिलांनी प्राविण्य मिळवून उपजिवीकेच्या नव्या संधी निर्माण केलेल्या आहेत सदर उद्योगांना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिला उद्योजकांनी पारंपारिक पद्धती तसेच नवीन तंत्रज्ञान यांचा योग्य अवलंब करून शाश्वत अर्थार्जनाच्या दिशेने भक्कम वाटचाल करावी अशा शुभेच्छा दिल्या तसेच सातारा शहरवासियांनी ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनाची याठिकणाहून खरेदी करावी असे आवाहन केले
उपस्थित महिला नवउद्योजिका आणि प्रेरिका यांच्याशी संवाद साधताना मा. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महादेव घुले यांनी प्रतिपादित केले की उमेद अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांनी व्यवसाय क्षेत्रात येवून बाजारपेठेमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करावी यासाठी शासन स्तरावरून योग्य ते सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली
मा. प्रकल्प संचालक श्री संतोष हराळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचत गटांमार्फत उत्पादित उत्पादनांना महाराष्ट्र शासनाने ‘मानिनी’ हा ब्रँड दिला आहे. ‘मानिनी’ या ब्रँडबद्दल ग्राहकांमध्ये कुतुहल, विश्वास आहे आणि कौतुक आहे. ही विश्वासार्हता अधिक वाढीस लागावी यासाठी महिला उद्योजकांनी आपल्या उत्पादनांचा दर्जा ग्राहकाभिमुख राखावा आणि चोखंदळ ग्राहक वर्गाच्या मागणीनुसार उत्पादनांचे पॅकेजिंग देखील आकर्षक ठेवावे असे सांगितले शासनस्तरावरून उमेद च्या माध्यमातून महिला उद्योजकांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे घेण्यात येतात, त्याचप्रमाणे विविध प्रकारची विक्री-प्रदर्शने वेळोवेळी भरविण्यात येतात याचा प्रत्येकाने अवश्य लाभ घ्यावा.
कार्यक्रमाचा समारोप करताना मा. गटविकास अधिकारी श्री. अनिल वाघमारे यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यापारी गाळ्यांचा उपयोग उमेद अभियानातील महिला बचत गटांनी प्रभावीपणे व नियमानुसार करून आपल्या व्यवसायात उन्नती साधावी असे प्रतिपादन केले. विविध सरकारी कामानिमित्त सातारा पंचायत समिती येथे नागरिकांचा राबता असतो तसेच पंचायत समिती त्याचपद्धतीन हे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने या व्यापारी गाळ्यांतून महिलांना आपला व्यवसाय वृद्धी करण्याची नामी संधी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा ‘उमेद’ च्या महिला बचत गटांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले. या प्रसंगी श्री माधव पाटील, उपविभागीय अभियंता, सा.जि.प. बांधकाम उपविभाग सातारा, श्री अंकुश मोटे जिल्हा अभियान व्यवस्थापक सातारा, श्रीम. स्वाती मोरे जिल्हा व्यवस्थापक, श्रीम. सुचिमा गायकवाड तालुका अभियान व्यवस्थापक, तसेच पंचायत समिती सातारा येथील अधिकारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी पंचायत समिती सातारा व उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सातारा यांनी पार यशस्वीपणे पाडली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button