कोपरगाव:-आमदार आशुतोष काळे यांच्या प्रभावी व्यक्तीमत्व आणि सकारात्मक कर्तबगारीमुळे ते भावी आमदार म्हणून यशस्वी होतील – सुपर स्टार अंकुश चौधरी.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
आमदार आशुतोष काळे यांच्या प्रभावी व्यक्तीमत्व आणि सकारात्मक कर्तबगारीमुळे ते भावी आमदार म्हणून यशस्वी होतील – सुपर स्टार अंकुश चौधरी.
कोपरगाव – आमदार आशुतोष काळे यांच्या प्रभावी व्यक्तीमत्व आणि सकारात्मक कर्तबगारी ने त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याने भावी आमदार म्हणून यशस्वी होतील असे गौरवोद्गार अंकुश चौधरी यांनी काढले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव येथे आयोजित कोपरगाव मतदारसंघातील दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ‘गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा’ आज महाराष्ट्राचे सुपरस्टार मा.श्री. अंकुशजी चौधरी व कोपरगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या वेळी सुपर स्टार अंकुश चौधरी यांनी बोलताना काढले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे राबवत असलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे विद्यार्थी पुढे जाऊन फक्त तालुक्याचे किंवा जिल्ह्याचेच नाही तर महाराष्ट्राचे व देशाचे नाव जगभरात उज्वल करतील असा विश्वास यावेळी मा.श्री. अंकुशजी चौधरी यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव, सर्व विश्वस्त, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, आजी माजी संचालक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.