ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-महाराष्ट्र भटके जोगी गोसावी समाजाच्या न्याय हक्कासाठी साताऱ्यात समाज रस्त्यावर.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

महाराष्ट्र भटके जोगी गोसावी समाजाच्या न्याय हक्कासाठी साताऱ्यात समाज रस्त्यावर.

सातारा : महाराष्ट्र राज्यातील जोगी गोसावी समाज नोंदणी करावी यासाठी आदिवासी संशोधन विभागामार्फत संशोधन होऊन एस.टी प्रवर्गात समावेश करावा. जोगी गोसावी समाजाला शासकीय जमीन उपलब्ध करावी. जातीच्या दाखल्यासाठी १९६१ पूर्वीची जाचक अट रद्द करावी. स्वतंत्र आश्रम शाळा मान्यता द्यावी. या मागणीसाठी आज भर पावसात जोगी गोसावी समाजाच्या स्त्री -पुरुषांनी भावी पिढीच्या प्रगतीसाठी साताऱ्यात मोर्चा काढला. या मोर्चाला जोगी गोसावी समाजातील महाराष्ट्र भटके जोगी गोसावी समाज संस्था राष्ट्रीय अध्यक्ष मोहन ( काली) घाडगे, लालासाहेब चव्हाण, श्रीनिवास घाडगे, शिवाजी गोसावी, आप्पासाहेब जाधव, अनिल जाधव, याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, महिला अध्यक्ष पूजा बनसोडे , युवा नेते स्वप्निल गायकवाड, आण्णा वायदंडे,गीतांजली पवार, शिवानी जाधव, रेखा जाधव, भोपाल घाडगे,आदी समाज बंधू – भगिनी उपस्थित होत्या.
सातारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा भर पावसात भिजत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. या वेळेला संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मोहन काली घाडगे आप्पासाहेब जाधव यांनी जोगी गोसावी समाजाच्या व्यथा उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासमोर पोटतिडकेनी मांडल्या.
या वेळेला आपल्या भावना शासकीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आम्ही कटंबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. जोगी गोसावी समाजाला ७७ वर्षापासून न्यायापासून वंचित ठेवलेली आहे. गोसावी समाजाच्या १३ जाती असून त्यांना निवाऱ्यासाठी जागा नाही. घरकुल नाही. स्वतःची अशी ओळख नाही. पूर्वजांनी शिक्षण न घेतल्यामुळे पुढच्या पिढीलाही वंचित रहावे लागत आहे. अशी व्यथा मांडण्यात आली. यावेळी प्रशांत आवटे यांनी निवेदन स्वीकारले.
————————————————–

छाया- सातारा उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना गोसावी समाजाच्या प्रश्नाबाबत चर्चा करताना मान्यवर( छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button