वडूज:-कु.वैष्णवी बनाजी पाटोळे हिची पुणे कारागृह पोलीस पदी निवड.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कु.वैष्णवी बनाजी पाटोळे हिची पुणे कारागृह पोलीस पदी निवड.
वडूज नगरीचे विद्यमान नगरसेवक जय मल्हार करिअर अकॅडमीचे संस्थापक, अध्यक्ष श्री. बनाजी पाटोळे सर यांची कन्या कु.वैष्णवी बनाजी पाटोळे हिची पुणे कारागृह पोलीस पदी निवड झाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री ना. मा.श्री.जयकुमार गोरे यांनी बोराटवाडी येथील निवासस्थानी तिचा सत्कार करून अभिनंदन केले !
यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), ज्येष्ठनेते मा.श्री. हरिभाऊ जगदाळे, भाजपा विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, युवानेते विशाल बागल , निलेश कर्पे , वडूज चे मा.नगरसेवक श्रीकांत (काका) बनसोडे आणि कु.वैष्णवी पाटोळे हिचे वडील बनाजी पाटोळे सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
वैष्णवीने आपली पुणे कारागृह पोलीस दलातील सेवा प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठ पद्धतीने बजावावी व आपल्या माण_खटाव तालुक्याचा लौकिक वाढवावा अशा सदिच्छा यावेळी व्यक्त केल्या. अनेक तरुण-तरुणी जय मल्हार करिअर अकॅडमी मध्ये मैदानी सराव व अभ्यास करून राज्यसेवा परीक्षा व पोलीस आणि सैन्य दलातील परीक्षा पास होऊन पुढे आपलं चांगलं करिअर घडवत असल्याचे समाधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी व्यक्त केले.