मुंबई सांताक्रुज रिक्षाचालकांच्या बेशिस्त पणामुळे बेस्ट प्रवासी त्रस्त.
प्रतिनिधी :-आशुतोष चव्हाण :-7378619519

दि :07/07/2022 मुंबई:- सांताक्रुज:- रिक्षाचालकांच्या बेशिस्त पणामुळे बेस्ट प्रवासी त्रस्त. बेस्ट प्रवासी वर्गातून होत असलेली अडचण बऱ्याच प्रवाशांनी व्यक्त केली. वेगवेगळ्या ठिकाणाहून सांताक्रुज बेस्ट स्टेशनच्या ठिकाणी प्रवासी प्रवास करत असताना रेल्वे स्टेशनच्या स्काय वापरून प्रवास करावा लागतो. बेस्ट मधून उतरून प्रवासी जात असताना रिक्षा चालकांच्या आडव्या-तिडव्या रिक्षा लागलेल्या असल्यामुळे त्यांना स्कायवाक वरती जाण्यासाठी तारेची कसरत करावी लागते. त्यातच मुसळधार पावसाने आपले रूप दाखवण्यास मुंबईकरांना सुरुवात केलेली आहे. बेस्ट प्रवासी वर्गातून रिक्षा चालकांनी रिक्षा पार्क करताना शिस्त पाळून प्रवाशांना त्रास होऊ नये तसेच बेस्ट धारकांना पण त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी अशी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे. ऑटो रिक्षा चालक ही प्रचंड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत असतात परंतु परंतु आपल्याच बंधू-भगिनींना त्रास होतो याची त्यांनी दक्षता घ्यायला हवी. नागरिकांची त्यांनी व्यक्त केली.