मायणी:-येरळा नदीच्या काठावरती राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
येरळा नदीच्या काठावरती राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
मायणी प्रतिनिधी—–बापरे, एकाच दिवसात गुरुवारी वर्षात पडणाऱ्या पावसाचा निम्मा पाऊस पडला ढगफुटी सादृश्य पाऊस झाल्याने येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे येरळा तलावात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने सध्याची पाण्याची आवक पाहता धरण सांडग्यावरून 3613 क्युसेस पाणी केरळा नदी पात्र सोडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे बनपुरी ते येरळवाडी धरण रस्ता पूल, अंबवडे ते गोरेगाव रस्ता पूल, मोराळे ते निमसोड रस्ता पूल, पाण्याखाली गेलेली आहेत त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना सूचित करण्यात येते की पुलावर पाणी असताना पुलावरून जाऊ नये, पूल ओलांडू नये तसेच या नदीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना सूचित करण्यात येते की येते की नदीकाठच्या परिसरात असणारी साहित्य ,जनावरे, बाहेर काढण्यात यावीत धरण परिसरातील लोकांनी कसल्याही परिस्थितीत धरणाच्या पाण्यात कोणतेही कारणाशिवाय जाऊ नये पाण्याची आवक पाहता अजून पाऊस झाल्यास नदीपात्रात अजून पाण्याची वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा देतो की कोणीही नदीपात्रात जाऊ नये असे शाखाधिकारी पाटबंधारे शाखा वडूज यांनी कळविले आहे.




