कराड:-सौ.वेणूताई चव्हाण एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व-प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सौ.वेणूताई चव्हाण एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व-प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार
कोळकी-यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनात प्राप्त झालेल्या मान सन्मानात वेणुताईंचे योगदान महत्त्वाचे मानले पाहिजे वेणूताईंची राजकीय दृष्टी मोठी असल्याचे यशवंतरावांनी मान्य करून सुद्धा यांनी कधी राजकारण न करता घर,संसार,दिरांची मुले, सासूव पतीप्रतिष्ठा यांच्या संगोपनाला महत्त्व देऊन यशवंतरावांचा संसार फुलविला. त्यांची पतीनिष्ठा,पतीप्रेम,देशप्रेम, स्त्रीलालित्य व घरंदाजपणा या बाबी आजच्या पिढ्यांना प्रेरणादायी व आदर्श ठरतील अशा असल्याने, सौ.वेणुताई चव्हाण एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन, मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख,प्रोफेसर डॉ.प्रभाकर पवार यांनी वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे केले. कार्यक्रमाक्या अध्यक्षपदी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.अल्ताफहुसेन नसरुद्दीन मुल्ला होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये श्री अरुण पाटील.श्री जयंत पाटील, प्र . प्राचार्या श्रीमती डॉ.स्वाती सरोदे, माजी प्राचार्य बाबासाहेब कालेकर, प्राचार्य डॉ.सूर्यकांत केंगार,श्रीअर्जुन ओवा,उद्योजक श्री.बुदियानी इत्यादी उपस्थित होते
यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज व वेणूताई चव्हाण कॉलेज,कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सौ.वेणूताई चव्हाण जयंती समारंभात,” वास्तल्यसिंधू सौ.वेणूताई”,या प्रोफेसर डॉ.प्रभाकर पवार प्रमुख वक्ते म्हणून या विषयावर विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना पुढे म्हणाले, यशवंतरावांच्या सुखदुःखात वेणूताईंनी मोलाची साथ दिली.नवीन लग्न झाले त्यावर्षीच त्यांनी कारावास भोगला. त्यामुळे त्या स्त्री स्वातंत्र्य सेनानी ठरतात.सुरुवातीच्या काळात तुटपुंज्या परिस्थितीत त्यांनी नेटाने संसार केला.घरातील दिर भावजय, नणंदा,पुतणे,भाचे, भाऊ, बहीण,सासू,जावा यांना लावला. नोकर चाकरांना माया लावली. यशवंतरावंच्या आयुष्यात त्यांनी मोलाचे सल्ले देऊन बाजू सावरल्या. स्वतः आजार सोसून यशवंतरावांच्या चढत्या विकासकाळात त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. वेणूताई आदर्श जीवन जगल्या,त्यांनी दुःख रिचवून सर्वांना आनंद दिला.त्यांच्या स्वभावात असलेल्या श्रद्धाळूपणा,करुणा, सौजन्यशीलता,सात्विकता,शालिनता शोषिकपणा,प्रेमळपणा,आतिथ्य, परोपकार,दूरदृष्टी आणि माणुसकी इत्यादी गुणांमुळे त्यांचे स्थान समाजासमोर आणि तमाम स्त्री जगतासमोर भगिनी,माता,सून,पत्नी आणि मानवतावादी स्त्री म्हणून सदैव आदर्श आणि प्रेरणादायी असेच राहील हे त्यांचे योगदान भावी पिढीने लक्षात घेऊन त्यांच्या आचार विचारांचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे,असेही प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांनी आवर्जून सांगितले
अध्यक्षपदावरून बोलताना माननीय श्री.अल्ताफहुसेन मुल्ला म्हणाले, यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण हे महाराष्ट्राला घडविणारे व विकसित करणारे दांपत्य होते.स्वतः कष्ट करून उभयतांनी महाराष्ट्राला वेळोवेळी आधार दिला.त्यांनी जो आपल्यासमोर आदर्श ठेवला आहे तो लाख मोलाचा असून त्याचे पालन आपण केले पाहिजे आणि त्यांचा त्याग,श्रम,चिकाटी,प्रेमळपणा व माणुसकी या गोष्टींचे स्मरण ठेवून भावी पिढ्यांनी वाटचाल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कु.स्वाती मोरे या विद्यार्थ्यांनीने आपले मनोगत व्यक्त केले.निबंध व वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना व पालकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोग रक्कम व परशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.सौ.वेणुताई चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार व अभिवादन झाल्यानंतर कॉलेजच्या शब्दबंद भित्तिपत्रकाचे प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र.प्राचार्या डॉ.सौ. एस.आर.सरोदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.जे यु. दीक्षित यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.एस. पी.पाटील यांनी केले.कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज व वेणुताई चव्हाण कॉलेज,कराडचे दोन्ही प्राचार्य,प्राध्यापक+प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी- विद्यार्थिनी व पालक बहुसंख्येने हजर होते.शेवटी डॉ.जी ए कदम यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.