
मायणी येथे महामानवाला अभिवादन प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी समतेचे पुरस्कर्ते शेतकऱ्यांचे पालन हार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला त्यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मायणी येथे अभिवादन करण्यात आले या दिवशी सकाळी चांदणी चौकात महामानवाच्या प्रतिमेचे धम्म पद्धतीने पूजन विधिवत करण्यात आले संपूर्ण मायनी परिसर भीममय झाला होता सायंकाळी सात वाजता या महामानवाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे सरपंच सचिन गुदगे उपसरपंच जगन्नाथ भिशे तसेच असंख्य नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी या महामानवाला अभिवादन केले या मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणीय होती या मिरवणुकीत महात्मा फुले मित्र मंडळ लहुजी वस्ताद मंडळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ भीम राजा प्रतिष्ठान आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक मित्र मंडळ मुस्लिम समाजातील कार्यकर्ते ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते