महाराष्ट्र

तडीपार युवकावर पूर्व वैमनस्यातून हल्ला

प्रतिनिधि:- अभिजित बल्लाळ कराड

कराड बसस्थानका नजीक असलेल्या सिटी ईन बार व देशी दारू दूकाना समोर पोलीसांच्या रेकॉर्डवर असलेल्या तडीपार गुन्हेगार यूवकावर पूर्वीच्या वादाच्या रागातून दोघांनी लाकडी दांडक्याने निर्दयपणे मारहाण केल्याची आज दूपारी घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या मारहाणीत संबधित यूवक गंभीर जखमी झाला असून त्यास काॅटेज हाॅस्पिटल व नंतर सातारा सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. जमीर मलिक शेख (फकीर) वय 30, रा. ओगलेवाडी-हजारमाची असे या हल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे.याबाबत घटना स्थळावरुन व पोलिसांनी दिलेल्या माहिती नूसार कराड बसस्थानक परिसरात देशी दारू व सिटीइन बारच्या समोर साडेतीन वाजण्याच्या सूमारास हाजारमाची येथिल जमीर शेख याच्यावर दोघांनी अचानक हल्ला केला. लाकडी दांडक्याने निर्धयपणे तीस ते चाळीस वेळा लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवला. या हल्ह्यात शेख याच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याला तात्काळ काॅटेज हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सातारा सिव्हिल येथे हलवण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button