आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पिंपरद (ता. फलटण )येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पिंपरद (ता. फलटण )येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन.
फलटण – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरद (ता. फलटण ) यांच्या वतीने व अक्षय ब्लड बँक फलटण यांच्या सहकार्याने पिंपरद ता. फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते होणार असून यावेळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांची उपस्थिती असणार आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरदच्या वतीने करण्यात आले आहे.