आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यात छत्रपती शिवजयंती निमित्त लक्षवेधी बॅनर व मिरवणुकीने केला मानाचा मुजरा.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात छत्रपती शिवजयंती निमित्त लक्षवेधी बॅनर व मिरवणुकीने केला मानाचा मुजरा.

सातारा दि: रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त जगभर उत्साह संचारला आहे. छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात जयंतीनिमित्त लक्षवेधी बॅनरने मानाचा मुजरा केला आहे. या बॅनरने पुन्हा एकदा साताऱ्यात समतेचा नारा दिल्याचे सिद्ध होत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य, कीर्ती व त्यांचे विचार आज मोठ्या प्रमाणात रुजले आहेत. महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊल ठेवताच जय भवानी… जय शिवाजी… ही घोषणा कानी पडतात. शिवजयंती निमित्त सर्वत्रच वारकरी संप्रदायाच्या भगवा पताका फडकला आहे. लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मुखी जय शिवरायांचा जयघोष निनादत आहे.३९४ वर्ष उलटूनही आजही तोच जोश अंगात संचारलेला आहे.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व जाती धर्मातील मावळ्यांना एकत्र करून शत्रूशी लढा दिला. यामध्ये स्वकीय जातीच्या विरोधातही छत्रपती शिवराय लढले आहेत. अपप्रवृत्ती विरोधात त्यांची भवानी तलवार तळपत होती. आज त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र आनंदोत्सव दिसून येत आहे .
सातारा शहरात सर्वाधिक लक्षवेधी बॅनरमधून विविध जातीतील मावळ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतलेली आहे. तसेच इतर जातीच्याही लोकांचा सहभाग असल्याचे दाखवून दिले आहे. वास्तविक पाहता शिवाजी महाराजांच्या विरोधात जे जे होते त्यांचा नाम उल्लेख टाळला जातो. परंतु ,इतिहास कधी कुणाला माफ करत नाही.
आज शिवजयंती निमित्त आकर्षक व संदेश देणाऱ्या बॅनरने खऱ्या अर्थाने समतेचे विचार घरोघरी पोहोचल्याचे भाग्य सातारकरांना लाभले आहे अशी आता सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहे. भव्य मिरवणूक व विविध वाद्य वृंद आणि मावळ्यांची साथ यामुळे खऱ्या अर्थाने साताऱ्यात शिवजयंतीचा जल्लोष पाहण्यास मिळाला आहे.
——————————————————-
फोटो -सातारा शरद शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर व परप्रांतीय कलावंत (छाया- निनाद जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button